दिनांक ३०/०३/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यात चळे आंबे रांझणी, ओझेवाडी, सरकोली मुंढेवाडी, कोंढारकी परिसरात मोठ्या उत्साहात गुढी उभारून मराठी नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. गुढी मात्र वेगवेगळ्या स्वरूपात उभारल्या गेल्या काही कुटुंबानी
भगवा ध्वज व साखरेचा हार, तर काही कुटुंबांनी स्री - प्रधान व कृषी संस्कृती, कांहीं कुटुंबांनी व संस्थानी शिक्षणाच्या विविध संदेशांच्या तर काहींनी पारंपरिक पद्धतीने गुढ्या उभारल्या गेल्या.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर काही ठिकाणी यात्रेस गाव यात्रेस प्रारंभ होतो तर काही ग्रामीण भागामध्ये पाडवा वाचन व गाव यात्रा नियोजनास प्रारंभ होतो. तीर्थक्षेत्र रांझणी ता. पंढरपूर येथे श्री शंभू महादेव यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला यात्रेनिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ही यात्रा तीन गावात दिवस चालते . त्यानंतर कावड घेऊन काही भक्तगण शिखर शिखर शिंगणापूर येथे मार्गस्थ होतात. त्यानंतर हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला ते परत गावाकडे पोहोचतात त्यावेळी चळे ,आंबे ,तारापूर येथील दर्लिंग यात्रेनिमित्त विजापूर कडून येणाऱ्या फुलेक-याची भेट होते त्यानंतर यात्रेची संपूर्ण सांगता होते.
याच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चळे, आंबे , तारापूर , मगरवाडी, तालुका पंढरपूर येथे पाडवा वाचन कार्यक्रम होत असतो येथूनच श्री दर्लिंग देवाची यात्रा नियोजनाचा प्रारंभ होतो. एकूणच या चैत्र गुढीपाडव्या पासूनच अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न होत असतात एक प्रकारे नवीन उत्सव प्रारंभ हा समजला जात असल्याने सगळीकडेच आनंदोत्सव साजरा केला जातो.
सध्या रांझणी ता. पंढरपूर येथे यात्रेनिमित्त पालखी व कावडची चंद्रभागेत स्नान करून मिरवणूक यात्रेनिमित्त भेदिक आणि महाप्रसाद वाटप असलचे आयोजन
भारुड कीर्तन कर्मणीसाठी आर्केस्ट्रा आणि बाळासाहेब पिंपरीकर तमाशा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती सरपंच स्वाती दांडगे उपसरपंच मारुती भाकरे, ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील बाबासाहेब भाकरे व सर्व यात्रा कमिटीने दिली या यात्रेत कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन दक्ष असते या तीन दिवसाच्या कालावधीत गावात मोठ्या प्रमाणात उत्सव असून अनेक स्टेशनरी कटलरी खेळणी विक्रेते यांचे दुकाने थकले आहेत खरबूज कलिंगड त्यावेळेस त्याचबरोबर थंड पेय विक्रेते बर्फ गोळे उसाचा रस या सर्वांचा यात्रेकरू आस्वाद घेत आहेत.
तर सोमवार ३१ तारखेला रमजान ईद चा ही सण असल्याने रमजान ईद च्या सणा निमित्तही मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून येत आहे सणासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांची धावपळ दिसत आहे गुढीपाडव्या बरोबरच रमजान ईद चार सण ही मोठ्या उत्साहात या परिसरात साजरा करण्यात येतो . चळे ता. पंढरपूर येथे हिंदू बांधवाकडून मुस्लिम बांधवांसाठी चार दिवसांपूर्वीच ही इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे संस्थापक रामदास घाडगे, प्रा. ज्ञानेश्वर वाघमोडे, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष बंडू मोरे, प्रताप प्रल्हाद गायकवाड, बाळासाहेब घोडके याने चळे येथे असणाऱ्या दर्ग्यामध्ये जाऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जावेद मुलानी रहीम मुलानी यांनीही त्या शुभेच्छाचा सर्व बांधवा तर्फे स्वीकार करत हिंदू- मुस्लिम ऐक्याची परंपरा अबाधित ठेवले जाणार असे सांगत सुरकुर्माच्या आस्वाद घेण्यासाठी सर्वांनाच निमंत्रित केले. आलेकुवम सलाम ला.. ! वाअआलेकुवम सलाम..! असा प्रतिसाद दिला गेला.
0 Comments