LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महिलांनी सक्षमीकरण कायद्याची माहिती घेऊन चुकीच्या गोष्टी विरोधात सक्षम बनले पाहिजे:- अँड.प्राजक्ता फुगारे

दिनांक १०/०३/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
महिला सक्षमीकरण  कायदा महिलांना माहिती असायला हवा. तसेच कायद्याबरोबरच महिलांनीही स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे असते.सध्या समाजात चुकीच्या अनिष्ट वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी , वाद, घटना घडत  आहेत त्या विरोधात लढण्यासाठी सक्षम बनले  पाहिजे. सतर्क  राहिले पाहिजे.असे मत जिल्हा सत्र न्यायालय पंढरपूर येथील वकील अँड. प्राजक्ता फुगारे यांनी व्यक्त केले.त्या पंढरपूर तालुक्यातील चळे येथील बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र व श्रीकृष्ण महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित  कार्यक्रमात बोलत होत्या. 

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे  करण्यात आले.या  कार्यक्रमास महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योतीताई हिरेमठ ,पंढरपूर विमा प्रतिनिधी मंदाकिनी कदम  उपस्थित होत्या  पाहिजे. पोलिस कॉन्स्टेबल ज्योतीताई हिरेमठ यांनीही महिला सक्षमीकरणाविषयी महिलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या सहसंस्थापक  मालनताई बनसोडे,कार्यक्रमाचे अध्यक्ष सहा. प्रा. नाईक एस व्ही श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितीन बाबर तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन  प्रा. एस.एस. माळी  आभार  शितल बनसोडे यांनी मानले.



Post a Comment

0 Comments