लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्या पासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी जनतेच्या रोषाच्या रडारवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे चित्र संबंध वृत्तवाहिन्यावरून प्रकर्षणाने दिसत आहे. आणि धनंजय मुंडे यांनीही मी नैतिकतेच्या प्रश्नावरून व वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना सांगितले.
आणि हा राजीनामा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन नुकताच स्वीकारला असल्याचेही वृत्तसमोर आले आहे.
त्यामुळे आजचा दिवस आणि उद्याचे अनेक दिवस ही धनंजय मुंडे यांच्या राजीनामा भोवती केंद्रित होणार हे निश्चित आहे.
परंतु यापूर्वी धनंजय मुंडे राजीनाम्याचा विषय काढल्यानंतर मी का राजीनामा देवू . माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहेत ,माझा संतोष देशमुख हत्याप्रकरणी कोणताही संबंध नाही व माझ्यावर आरोपही नाहीत असे जाहीरपणे सांगत होते.
दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यानंतरही
नामदार धनंजय मुंडे ही मंत्रीपदाचा राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर ठाम होते.
परंतु ज्या वेळेस संतोष देशमुख यांचे हत्ये विषयी विविध फोटो समाज माध्यमावर सर्वच प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर एकच जनतेतून जनक्षोभ उसळला.. प्रत्येकाच्या मनात हत्या करणाऱ्या विषयी भयंकर चिड निर्माण झाली.
१) या हत्येतील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मीक कराड यांचा यापूर्वीचा धनंजय मुंडे यांच्याशी असलेला घनिष्ठ संबंध लक्षात घेता प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोष धनंजय मुंडे यांच्याकडे येऊन ठेपला होता.
२) त्यातच करुणा शर्मा प्रकरणही वरचेवर जास्तच बिघडत चालले होते.
३) आणि अर्थसंकल्प ही अधिवेशन चालू आहे विरोधाकाना थोपवण्यासाठी
या तीन कारणांमुळे धनंजय मुंडे पर्यायाने अजित पवार राष्ट्रवादी गट अन् सरकारही रडारवर आले होते. त्यामुळेच यापूर्वी राजीनाम्या बाबत सर्वच नेतेमंडळी सह
ना....ना.. करणारे धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आणि तो राजीनामा महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी स्वीकारलाही त्यामुळे राजीनामा वर पूर्णपणे पडदा पडला असून पुढे नेमके काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
0 Comments