दिनांक - ०३/०३/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क पत्रकारीतेचा उपयोग समाज हितासाठी झाला पाहिजे, चांगल्या गोष्टी नेहमी पुढे पाठवल्या पाहिजेत, आई- वडील हेच पूजनीय दैवत मानले पाहिजेत भारतातील खेडी श्रीमंत आहेत, अध्यात्म आणि टेक्नॉलॉजी याची सांगड घालत वाटचाल करत असताना प्रत्येकाला अन्न मिळाले पाहिजे आणि वृद्धाश्रमे नसायला हवीत हेच उद्याच्या उज्वल विकसित भारताचे स्वप्न असायला हवे .
असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी मांडले ते पंढरपूर येथील पंढरपूर प्रेस क्लब व स्वेरी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या (पत्रकारिता काल आज आणि उद्या या विषयावरच्या ) उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून एबीपी माझा न्युज चॅनल मुंबई महाराष्ट्र चे संपादक राजीव खांडेकर हे होते.
उद्घाटन मनोगत राजीव खांडेकर म्हणाले
नवीन येणाऱ्या नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने पहिला हवा असे सांगून कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही ठिकाणी यशस्वी होण्यासाठी त्या व्यक्तीची जिद्द चिकाटी प्रतिभा आणि क्रियेटीव्ह महत्वाचे असते. जुनं तंत्रज्ञान पूर्णपणे निरोपयोगी ठरत असेल आणि नवीन पर्याय म्हणून उपलब्ध होत असेल ते कमी खर्चिक कमी वेळेत होत असेल तर त्याचा स्वीकार निश्चितपणे करायला हवा असे सांगितले. त्यावेळी प्रस्ताविक स्पेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी केले.
यावेळी संस्थेचे सचिव बी. पी. रोंगे यांनी स्वागत पर मनोगत संस्थेचे सुरुवातीपासून आतापर्यंतच्या काळाचा उलगडा केला .
---------------------------------------
दुसऱ्या सत्रात
पत्रकारिते समोरील आव्हाने आणि समाजातील सर्व घटकांचा पत्रकारिता या लोकशाहीतील चौथ्या स्तंभाबाबतीत हवा असलेला सहभाग या विषयावरील चर्चासत्रात साधनाचे संपादक विनोद शिरसाट व एबीपी माझा न्युज चैनल चे संपादक राजीव खांडेकर यांनी सहभाग नोंदवला.
* यावेळी विनोद सिरसट यांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली
* व्यक्तिगत अनुभवावरून सामाजिक निष्कर्ष काढणे बरोबर नाही.
* सध्या पत्रकारितेतील दर्पण वाढले आहे आणि दिग्दर्शन कमी झाली आहे.
* संविधानात फक्त तीन स्तंभाचा उल्लेख आहे ते म्हणजे न्यायपालिका कार्यपालिका आणि कायदेमंडळ.
* चौथा स्तंभ पत्रकारितेचा नसून मानला गेलेला आहे त्याद्वारेच वरील तीन स्तंभावर वचक निर्माण होतो आहे म्हणजेच चौथा स्तंभ मानला गेला आहे.
* आणि सर्वात महत्त्वाचा पाचवा स्तंभ म्हणजे चळवळी आणि आंदोलने हा पाचवा स्तंभही वरील सर्वांवर दबाव गट म्हणून कार्य करतो.
* वेळ ,पैसा ,श्रम ,ऊर्जा ,वाचवणे म्हणजे नाविन्यता होय.
दुसऱ्या सत्रात राजीव खांडेकर बोलताना म्हणाले स्वतंत्र पूर्व कालखंडापासून ते स्वतंत्र्यानंतरह माध्यमांची गरज वाढत गेली आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरीही त्या तंत्रज्ञानाला आदेश देणारा शेवटी मानवी मेंदू महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सर्व स्त्रे मानवी मेंदूच्या हातातच राहू शकतात.
---------------------------
तिसऱ्या सत्रात
पंढरपूर व वारकरी संत साहित्य संदर्भातील पत्रकारांचे योगदान या विषयावर
रिंगण मुंबईचे संपादक सचिन परब व महाराष्ट्र दिनमान कोल्हापूर चे संपादक विजय चोरमारे यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी विजय चोरमारे यांनी अध्यक्ष स्थानावर बोलताना काही महत्त्वाचे निरक्षणे नोंदवली.
* पंढरपुरात येणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या नेते मंडळींना पदाधिकाऱ्यांना मंत्री महोदयांना पंढरपूरच्या स्थानिक प्रश्नावरचे प्रश्न विचारले पाहिजेत.
* पंढरपूरसाठी रेल्वेमर्गाचे जाळे अधिक विणले गेले पाहिजे. त्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे असे मत व्यक्त केले.
तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन परब याने महाराष्ट्रातील नवे सर्व देशातील संतांचे पवित्र स्थान हे पंढरपूरच आहे बाकी कुठेही जाण्याची गरज नसून सर्व अध्यात्मेचे बटन पंढरपूर आहे असे नमूद केले.
0 Comments