LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनांच्या "यु टर्न" वरून प्रहार संघटना ११ एप्रिल रोजी आमदाराच्या घरासमोर १२ वाजता मशाल पेटवणार ; पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेवून करणार प्रारंभ

दि. २ एप्रिल २०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क

शेतकर्यांचे शेतीचे कर्ज माफ करून शेतकर्यांचा ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतक-याची कर्जमाफी केली नाहीच उलट  कर्ज भरणाच्या सूचना वजा दमच दिला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असुन प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी ११ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता आमदारांच्या घरासमोर मशाल  पेटवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 त्यामळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बच्चूकडू यांनी केले आहे. सोलापूर जिल्हा ऊस पट्टयाचा बालेकिल्ला समजला जातो व शेतक-याचे कोणतेही आंदोलन याच सोलापूर जिल्ह्यातून आक्रमक होत गेली आहेत. त्यामुळे आता सोलापूर जिल्हातील शेतकरी  या मशाल आंदोलनात कितपत सहभागी होतात  यावर आंदोलनाचे यशापयश अवलंबून आहे. महायुती सरकारने सत्तेवर येण्या अगोदर ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन दिले होते.  परंतू या आश्वासनांपासून  सरकार दूर पळत आहे , सरकारला आश्वासनांच्या मूळ ठिकाणी आणण्यासाठी 
  आता शेतकर्यांनी आपली एकजुट दाखवून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन प्रहार संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

     राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ११ एप्रिल रोजी विठ्ठलाचे दर्शन घेवून माजी आमदार बच्चु कडू हे आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सध्या कर्ज माफीच्या प्रश्नावरून प्रहार ने शेतक-याच्या या  प्रश्नांची मशाल हाती घेतली आहे. 



Post a Comment

0 Comments