दिनांक ०२/०३/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
पंढरपूर तालुक्यातील चळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनेक संस्था व मंडळाकडून वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम घेण्यात आले त्यात अनेक संस्थांनी व वैयक्तिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. एकंदरीत शिवसप्ताहच साजरा करण्यात आला .
ऐतिहासिक साहित्य, वस्तू, प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते समय विद्यार्थी व युगंधर आखाड्याचे राजू अनवते सर
लोकसहभागातून बनवण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना. मुख्य शिवजन्मोत्सव समितीने विविध ठिकाणी डिजिटल फलकाद्वारे छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तुत्वाच्या इतिहासाचे छायाचित्रांद्वारे प्रदर्शन दर्शवले त्यामध्ये किल्ल्याची बांधणी, लढाई, संत तुकाराम महाराज व शिवाजी महाराज यांची "भक्ती- शक्ती" युती, राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी यांच्यासह विविध तर
ऐतिहासिक छायाचित्रे बसवण्यात आली होती.
त्याचबरोबर संबंध महाराष्ट्रात युगंधर आखाडा द्वारे चर्चेत आलेला राजू अनवते यांचे इतिहासकालीन साहित्य प्रदर्शन.
त्याचबरोबर एक दिवशीय "ग्रंथ प्रदर्शन व विक्री" दालन भरवण्यात आले होते .
शिवजन्मोत्सव समिती चळे व संभाजी ब्रिगेड पंढरपूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले ग्रंथ प्रदर्शन व विक्री
शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध गुणवत्तापूर्वक निबंध , वक्तृत्व स्पर्धेबरोबरच , शरीर कसरतीच्या ही स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेत कु. श्रुती अतुल गायकवाड व प्रतीक मोहन वाघ यांनी आपल्या वक्तृत्वातून इतिहास जागा केला त्याचबरोबर तेजस पाटील यांचेही व्याख्यान आयोजित केले होते.
त्याचबरोबर सिध्दनाथ सार्वजनिक वाचनालय श्री दर्लिंग विद्यामंदिर व भास्कर आप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने "वाचन संकल्प महाराष्ट्राचा व लेखन संकल्प चळेगावचा" या अभियान न राबवून घेतलेले हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवजयंतीचे औचित्य साधून घेण्यात आले त्यामध्ये ३९७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विजेत्यांना बक्षीस व सर्व सहभाग धारकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
सिद्धनाथ सार्वजनिक वाचनालय चळे आयोजित
वाचन संकल्प महाराष्ट्राचा लेखन संकल्प चळेगावचा या अभियानांतर्गत श्री दर्लिंग विद्यामंदिर व भास्कर अप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी बक्षीस व प्रमाणपत्र सहित विद्यार्थी व शिक्षक
तसेच शिवरत्न शिवजन्मोत्सव बाल समितीनेही लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा, चित्रकला, रांगोळी स्पर्धा , संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करून लक्ष वेधून घेतले होते. आणि प्रगतशील शेतकरी युवराज गायकवाड यांनी छावा हा चित्रपट मोफत दाखवला. सिताराम दांडगे, गणेश शिंदे, बंटी वाघ मित्रपरिवार यांनी अनुक्रमे मंडप डेकोरेशन, डिजिटल फ्रेम मोफत, विद्यार्थ्यांसाठी बक्षीस म्हणून ट्रॉफी विनामूल्य दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी चळे ते अंतरावली सराटी असा बैलगाडी द्वारे प्रवास करणारे व नंतर वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणा साठी पाठिंबा देणारे, उपोषण करणारे प्रतिनिधी, व वृक्षारोपण करून संवर्धन करणारे वृक्षम मित्रपरिवार यांचा सत्कार करण्यात आला .
0 Comments