दि. २५/०२/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या आशीर्वादाने २३ फेब्रुवारी रोजी 'अमृत प्रोजेक्ट' अंतर्गत 'स्वच्छ जल, स्वच्छ मन' अभियानाच्या तिसऱ्या टप्याचे आयोजन सर्वत्र करण्यात आले. यावेळी दिल्लीतील निरंकारी मिशनच्या ग्राउंड नं ८ येथे एक विशाल सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या अभियाना अंतर्गत सोलापूर जिल्हा परिक्षेत्रातील पंढरपूर ब्रँच अंतर्गत स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.
पंढरपूर येथील चंद्रभागा घाट ,दत्त घाट ,कासार घाट,येथील स्वच्छता करण्यात आली. यामध्ये पंढरपूर ब्रँच ,मंगळवेढा ब्रँच व चळे ब्रँच सहभागी होते.मोठ्या संख्येने सेवादल व भक्तगणांनी यावेळी भाग घेतला.
२७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १६५० पेक्षा अधिक ठिकाणी १० लाखांहून अधिक संख्येने सेवाभावनेने ओतप्रोत स्वयंसेवक भक्तगणांनी एकाच वेळी हे महान अभियान साकारले.
या कार्यक्रमावेळी पंढरपूर ब्रँच मुखी गिताताई घोडके मंगळवेढा ब्रँच मुखी युवराज कोळी चळे ब्रँच मुखी दिगंबर वाघमोडे तसेच सेवादल संचालक अनिल माने , अभिषेक कोरे , पोपट काशीद , योगेश भोसले , कल्पना शिंदे , तुकाराम कोळी व सर्व सेवादल महात्मा व बहेनजी साधसंगत उपस्थित होते.
0 Comments