LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कौशल्यांना वाव मिळतो:- आ. खरे

चळे प्रतिनिधी 
     
               वार्षिक स्नेहसंमेलना सारखे कार्यक्रम घेतल्याने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो तसेच समाज प्रबोधन पर नाटकामधून सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर कसा परिणाम होतो  याचे काही ठिकाणी प्रत्यक्ष दाखवले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर अनुकूल परिणाम होऊ शकतो. अंगभूत कौशल्यांना वाव दिला जातो असे मत आमदार राजू खरे यांनी व्यक्त केले ते आंबे ता. पंढरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक   शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध कलाविष्कार  कलागुणांचा हा कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ प्राजक्ता ताई सुशील सावंत या होत्या.

आंबे ता. पंढरपूर येथील जि.प. प्राथमिक शाळेत "कलाविष्कार" सादर करताना टिपरी नृत्यातील मुली

   यावेळी गटशिक्षणाधिकारी माननीय श्री मारुती लिगाडे, विठ्ठल  क्रेडिट चे चेअरमन दिलीप कोळी , उपसरपंच निशाल शिंदे , सहकार शिरोमणी चे संचालकअण्णा शिंदे , एसएमएसी अध्यक्ष शंकर लिंगा भोसले, उपाध्यक्ष  ज्ञानेश्वर माऊली कोळी, ग्रा. सदस्य  अशोक अण्णा शिंदे ,  तंटामुक्त  अध्यक्ष सगन शेख, सचिन पाटील  सचिन भैय्या वाघाटे , नाना सावंत, संजय ताड, शिक्षक पतसंस्था अध्यक्ष रामभाऊ यादव , बा.का शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण घेरडे   यांच्यासह गणेश कांबळे, अरुण शिंदे, श्रीरंग कोळी, भारत गायकवाड, संतोष कोळी, अशोक क्षीरसागर, दत्ता माने,तानाजी शिंदे तसेच सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कल्पना ढेरे मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन श्री संभाजी माने गुरुजी यांनी केले.


Post a Comment

0 Comments