दिनांक - २१/०२/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
श्रीकृष्ण महाविद्यालय चळे व बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय चळे येथील विद्यार्थिनी कु.आश्विनी उत्तम खडसरे रा.मगरवाडी ता पंढरपूर यांची मुंबई पोलीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल आज दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगापूर्वी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एल. तांबे सर , तसेच सुरेश बनसोडे सर व श्रीकृष्ण महाविद्यालय व बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहा.प्राध्यापक डॉ. होनकळस सर यांनी केले.
0 Comments