दिनांक १६/०२/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
उद्घाटनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.राजेंद्र वडजे सर तसेच विभागीय समन्वयक डॉक्टर संजय मुजमले सर यांच्या हस्ते करण्यात आले.विशेष श्रमसंस्कार शिबिर हे सलग सहा दिवस चालणार असून सकाळी दहा ते बारा या वेळेत श्रमदान म्हणजे संपूर्ण गाव स्वच्छता व तसेच दुपारच्या सत्रात व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी आंबे गावचे सरपंच प्राजक्ता सावंत , उपसरपंच निशाल शिंदे,ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे,गणेश कांबळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील, प्रगतशील बागायतदार संभाजी शिंदे, एबी मराठी न्युज चे संपादक गणेश गायकवाड,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक कोळी सर तसेच वाघमारे सर,श्रीकृष्ण महाविद्यालय व बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बळीरामदादा बनसोडे तसेच श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितीन बाबर सर बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शशिकांत तांबे सर , NSS विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर होणकळस सर व पुनम एडके मॅडम व सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या संपूर्ण शिबिरात स्वच्छता अभियानाबरोबरच समाज उपयोगी विविध उपक्रम राबवून विविध शैक्षणिक व सामाजिक विषयावर प्रबोधन पर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती
या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा सांगता समारंभ माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या वतीने विविध कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला आमदार सावंत यांनी अशा प्रकारची राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे विविध महाविद्यालयांनी अधिक गतिमान पद्धतीने राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर बळीराम दादा बनसोडे शिक्षण शास्त्र महाविद्यालय व श्रीकृष्ण महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले.

0 Comments