दिनांक १६/०२/२०२५
खास बात आमनेसामने
लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायती ने दिव्यांगाना 5% अपंग निधी वाटप करणे बंधनकारक आहे परंतु बहुतांश ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी हा निधी वाटप केला नाही , जाणून बुजून दुर्लक्ष केले जात होते. या बाबतीत गटविकास अधिकारी यांना वारंवार लेखी अथवा तोंडी निवेदन दिले होते. अनेक वेळा उपोषण, आत्मदहन सारखी आंदोलनेही करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणुन पंढरपूर बी.डी.ओ. नी प्रहार संघटनेला पत्र देऊन चर्चेसाठी मिटींगला बोलावले. यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकही उपस्थित होते.
परंतु प्रहार संघटनेच्या पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नां मध्ये व ग्रामसेवकानी दिलेल्या माहिती उत्तरामध्ये तफावती दिसून आल्या.
त्यामुळे प्रहार संघटना पदाधिकारी, बी.डी.ओ. व ग्रामसेवकांमध्ये बाचाबाची झाली. व लागलीच ग्रामसेवक भुजबळ व इतर जणांनी प्रहार संघटनेचा निषेध व्यक्त करत प्रहार संघटनेवर सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी कामबंद आंदोलन सुरु केले. व पुन्हा निधी संदर्भात आमच्याकडे यायचे नाही असे बी. डी. ओ. यांनी दिव्यांगांना सांगीतले.
या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेने देखील आम्हाला लेखी पत्र देऊन चर्चा करण्यासाठी बोलवून आम्हाला हिन दर्जाची वागणूक देऊन अर्वाच्य भाषा वापरली म्हणून पंढसूर शहर पोलीस ठाण्यात बी. डी. ओ. तसेच ग्रामसेवक भुजबळ सह इतरांवर कलम 92 नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन व अर्ज दिला आहे.
जर यांचेवर गुन्हा दाखल करून घेतला नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे आंदोलन करतील असा इशारा प्रहार दिव्यांगक्रांती महिला अध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांनी दिला आहे.
त्याचबरोबर दिव्यांगाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे काय असा सवाल उपस्थित केला..?
0 Comments