दि. १९/०१/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
शिक्षकानी ज्ञानदानाचे कार्य करीत असताना स्वतःचा आत्म सन्मान राहील असे केलेले कार्य व कोणताही चुकीचा डाग न चिकटवलेली सेवा हीच खऱ्या अर्थाने समाजाच्या दृष्टीने सेवापूर्ती ठरते,असे मत पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन वसंतनाना देशमुख यांनी व्यक्त केले. ते चळे तालुका पंढरपूर येथील केंद्र शाळेतील मुख्याध्यापिका सौ.कल्पना जगताप भुसे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना वसंतनाना देशमुख व उपस्थित शिक्षक अन्य मान्यवर
या कार्यक्रमास आवताडे शुगर चे चेअरमन संजय आवाडे, मंगळवेढा न.पा. नगरसेवक अजित जगताप ,पंढरपूर पंचायत समिती चे माजी सभापती राजेंद्र पाटील, माजी उपसभापती विजय देशमुख ,प्रशांत देशमुख, शिक्षक पदाधिकारी बाळासाहेब काळे, रामभाऊ यादव, उत्तम जमदाडे , सुधाकर कवडे, एम. बी. जाधव , अनिता चौधरी, विकास बढे या सर्वांनी उपस्थित राहून मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या. सूत्रसंचालन प्रशांत ठाकरे यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments