लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील राजमाता जिजाऊ महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा तालुका कार्यक्षेत्र प्रारंभ व १२वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात जिजाऊ जयंती दिवशी संपन्न झाला. या दिवशी महिला हितगुज मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, सौ.अवंती पाटील, सौ. पूजा गायकवाड, सौ. उज्वला वाघ या सर्व वक्त्यांनी विचार व्यक्त करताना पालकत्वाची भूमिका, माणसातील सहकार्याची भावना, जिजाऊचे प्रेरणादायी कर्तृत्व, शिवबाचे बालपण, विश्वासाची प्रेरणा, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक संस्थापक रामदास घाडगे, संस्थेचा प्रवास आम आदमी पार्टी चे तालुका अध्यक्ष बंडू मोरे, यांनी मांडला. आभार संस्थेच्या चेअरमन सौ. चंद्रभागा घाडगे यांनी मानले.
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य अमरजीत पाटील, चळे सोसायटी न. १ चे चेअरमन अँड. प्रतापराव मोरे, प्रताप गायकवाड, दिपक मोरे, मोहन गायकवाड , मोहन वाघ, सरपंच सौ. शालन शिखरे, उपसरपंच सौ. मेघा मोरे, बचत गट संघ अध्यक्षा सौ. दिपाली गायकवाड, यांच्या सह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक गणेश मलपे, तानाजी गायकवाड, हरीभाऊ शिखरे, यांच्या सह सर्व संचालक यांनी परीश्रम घेतले.
0 Comments