दि. ०६/०१/२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील मुख्याध्यापिका सौ. कल्पना जगताप - भुसे यांचा चळे केंद्र शाळेतील आयोजित शिक्षण परिषदेत सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी पंढरपूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, चळे केंद्र प्रमुख मारुती काळुंगे, विठ्ठल चे माजी संचालक संतोष गायकवाड, कृष्णा भुसे , सरपंच ज्ञानेश्वर शिखरे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष रामदास घाडगे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अतुल सटाले, माजी मुख्याध्यापक कुबेर फुगारे उपस्थित होते. हा सत्कार सोहळा विठ्ठल चे माजी जेष्ठ संचालक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
मानपत्र अनावरण प्रसंग
सेवानिवृत्ती निमित्त चळे गावातील सिध्दनाथ सार्वजनिक मुक्त वाचनालय व लोकविकास शेतकरी बचत गटातर्फे " लोकविकासाचे सिध्दनाथ" पांडुरंग सदाशिव साने (गुरुजी) हे मानपत्र देवून गौरविण्यात आले. हे मानपत्र . हे मानपत्र साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंती निमित्त देण्यात आले.
या केंद्र शाळेच्या अख्यत्यारीत असणाऱ्या शाळा तर्फे सत्कार करण्यात आला. अनेक शिक्षक व शाळा व्यवस्थापन सदस्य यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी डॉ. वैशाली गायकवाड, सुलभा कुंभार, उज्वला वाघ, चांदणी पंडीत, प्रशांत ठाकरे, आण्णासाहेब रायजादे, केंद्र प्रमुख मारुती काळुंगे, नेताजी गायकवाड, सतिश बुवा, विकास बढे, अतुल मोरे उपस्थित होते.
मानपत्र वितरण प्रसंग
मानपत्र देताना गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, केंद्र प्रमुख मारुती काळुंगे, वाचनालयाचे अध्यक्ष अतुल मोरे, नेताजी गायकवाड शिक्षक व व्यवस्थापन समिती सदस्य
0 Comments