दि. ०७/०१/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन जेष्ठ संचालक श्री दिनकरभाऊ मोरे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यपूर्ती वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील विविध संस्थांकडून सत्कार करण्यात आले.
चळे सोसायटी कार्यालय
चळे ता. पंढरपूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नंबर एक व नंबर चार त्याचबरोबर चळे ग्रामपंचायत, सुब्राव गायकवाड, गोरख वाघमोडे , विठ्ठल चे माजी संचालक संतोष गायकवाड, सहकार शिरोमणी चे संचालक बाळासाहेब माने, माजी सरपंच बळिराम बनसोडे, उपसरपंच सौ. मेघा दिपक मोरे, संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष रामदास घाडगे, प्रताप गायकवाड, माजी मुख्याध्यापक कुबेर फुगारे, यांनी सत्कार केला. त्याचबरोबर पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषद पदाधिकारी, माजी आमदार प्रशांत परिचारक पांडुरंग चे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी, विविध विभागाचे कर्मचारी प्रतिनिधी, मार्केट कमिटीचे सभापती हरीश गायकवाड व संचालक मंडळ, सुनिल भोसले, भाजपसह विविध पक्षांचे कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनी द्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या.
. दिनकरभाऊ मोरे यांचा सन्मान करताना, कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी व विभागाचे पदाधिकारी व मान्यवर
0 Comments