लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील श्री दर्लिंग विद्यामंदिर व भास्करआप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयात समाज प्रबोधनकार व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांचे खास विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी न समजलेले "आई- बाबा" समजून घेताना या विषयावर व्याख्यान नुकतेच संपन्न झाले,
हे व्याख्यान श्री सुरज भारत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले होते.
प्रा. वसंत हंकारे यांनी आई बाबा समजून घेताना या विषयावर विविध पैलूंना भाव-भावनांना स्पर्श करत प्रत्येकालाच कर्तव्याची जाणीव करून देत 'मुलांची कर्तव्ये व पालकांची भूमिका' या विषयाला हात घालत प्रत्येकालाच भावनाविवश करत हसवले आणि रडवलेही विविध पराक्रमी इतिहास पुरुषांची गौरवपूर्ण उल्लेख करत देशप्रेम ही जागृत केले.
त्याचबरोबर राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त वेशभूषा दिन आयोजित करण्याबरोबरच बाजार डे ही आयोजित केला त्याचबरोबर डॉ. अर्चना साळुंखे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. साळुंखे यांनीही राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध ऐतिहासिक घटनाक्रमांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य जे बी गायकवाड यांच्या सह सर्व शिक्षक वृंद यांनी परीश्रम घेतले.
0 Comments