चळे सहकारी सोसायटी नं.१ मध्ये लाभांश वाटप कार्यक्रम.
दिनांक:- २५/१०/२०२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-

शासनाचे शेतकरी सभासदांना "शून्य" टक्के व्याजदराने एक वर्षाच्या कालावधीसाठी कर्ज पुरवठा धोरण असल्याने सहकारी सोसायटीचे उत्पन्न आपोआपच घटले आहे त्यावर उपाय म्हणून सहकारी सोसायट्यांनी नवीन उपक्रम राबवून उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत असे आवाहन पांडुरंग चे माजी चेअरमन श्री दिनकरराव मोरे यांनी केले. ते चळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नंबर एक च्या वतीने आयोजित लाभांश वाटप कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी संस्थेच्या सभासदांना दहा टक्के दराने लाभांश वाटप त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला.
या कार्यक्रमात चळे सोसायटीचे व्हा. चेअरमन सचिन वाघमोडे, संचालक रामचंद्र गायकवाड, दिपक मोरे, बंडू मोरे डी एम वाघमोडे यांनी विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास उत्तम मोरे, आप्पासाहेब मोरे, कुबेर फुगारे, ज्ञानेश्वर शिखरे ,माजी सरपंच बळीराम बनसोडे, दत्तात्रय शिंदे, राजाराम वाघ, गोरख वाघमोडे, विठ्ठल व्यवहारे ,बंडू शिंदे, विठ्ठल शिंदे, महादेव व्यवहारे, संजय मोरे , मच्छिंद्र जाधव, बाळू पाटील. ज्ञानेश्वर गडदे, दत्तात्रय वाघमोडे कांतीलाल वाघ, सुभाष पंडीत , सुभाष वाघमोडे, यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिव हनुमंत काळे यांनी केले स्वागत व आभार अतुल मोरे यांनी मानले.
0 Comments