लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरागे पाटील यांनी सरकार व विरोधी पक्षांना मराठा आरक्षणा संदर्भात भूमिका जाहीर करा योग्य निर्णय घ्या असा इशारा दिला होता.
मनोज जरंगे पाटील यांची कोणत्याच सत्ताधारी अथवा विरोधक पक्षाने मागणी मान्य केली नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी जिथे शक्य असेल तिथे उमेदवारी दाखल करा असा सल्ला दिला होता. त्या अनुषंगाने सुमारे राज्यात ८०० ते ९०० जनांनी निवडणूक लढवण्यास इच्छा व्यक्त करणारे अर्ज दाखल केले होते. त्याचबरोबर मी उमेदवार जाहीर करणार नाही तुम्हीच एकमताने उमेदवार ठरवा असे जाहीर केले होते.
त्या अनुषंगाने २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी श्री युवराज दिनकर गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची पूर्ण तयारी केली असून ते उद्या दिनांक २८ ऑक्टोबर रोजी आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती मुख्य सूत्राकडून मिळाली आहे.
त्यांनी चळे पंढरपूर ते आंतरवाली सराटी बैलगाडी यात्रा तसेच गावातून मराठा आरक्षणासंदर्भात मागणीचा रेटा लावून धरण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला होता. मनोज जरंगे पाटलांचा आदेश शिरसंवाद मानून व आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत ठेवण्यासाठी ते उद्या कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल करणार आहेत.
0 Comments