LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

६:३:२ विरुद्ध ४:३:२:१:१ अशा अंदाजीत लढतीच्या उत्तरात(४:३:१:१:१:१) अनेक नवखे आमदार होणार ..? उमेदवारी मिळण्याचे दाट संकेत याचे रूपांतर केव्हा आणि कशात होणार.? याकडे सर्व पक्षांचे लक्ष .

दि.२०/१०/२४
रविवार राज की बात 

लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूक  प्रारंभ होण्याची २२ ऑक्टोबर तारीख उंबरठ्यावर आली आहे एक..एक दिवस निवडणुकीच्या दिशेने जात असताना कोणत्या पक्षाने कीती आणि कोणत्या जागा निवडणार कोणते मतदार संघ कोणाच्या वाट्याला येणार..? 

आदला.. बदल.. होणार का..? ते महायुतील  व महाविकासआघाडीतील  समाविष्ट पक्षांना मान्य होईल का..? या बाबतीतला गंभीर प्रश्न  उपस्थित होत असून सोलापूर जिल्हात ५..३..३ विरूद्ध चार..तीन.. दोन.. एक..एक..? असे समीकरण  होवून सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
            सोलापूर जिल्ह्यात पूर्वी १३  आमदार होते अकरा तालुक्यातील ११ व सोलापूर शहरातील दोन परंतु मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 11 तालुका विधानसभा मतदारसंघाची होऊन दोन विधानसभा मतदारसंघ रद्द झाले व ग्रामीण ९ विधानसभा व सोलापूर शहरातील दोन विधानसभा मतदारसंघ असे 11 आमदार असलेला सोलापूर जिल्हा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. अकरा तालुक्यातून नऊ आमदार व शहरातील दोन आमदार निवडून येणार असल्याने आता कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा आमदार निवडून येणार याची चर्चा घडू लागली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडीतील शरद पवार राष्ट्रवादी कडे (माळशिरस, माढा, पंढरपूर, करमाळा) काँग्रेसकडे (दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, शहर उत्तर,) शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे (मोहोळ किंवा सांगोला, बार्शी) तर सांगोला शेकाप, शहर मध्य माकप साठी असा ४:३:२:१:१ महाविकास आघाडीच्या फार्मुला चर्चा आहे. ( अखेरच्या क्षणात बदल होऊ शकतो)
        "तर महायुतीतील भाजपकडे ( माळशिरस,  पंढरपूर- मंगळवेढा, शहर उत्तर, बार्शी, अक्कलकोट, द.सोलापूर) राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे  ( माढा,  मोहोळ, करमाळा) तर शिवसेना शिंदे गटाकडे  (सांगोला, शहर मध्य ) असा ६:३:२  चा निवडणुकीचा अंदाजीत फाॅर्मुला चर्चेत आहे  .  म्हणजे महायुती ६:३:२ विरोधात महाविकास आघाडी ४:३:२:१:१ अशी लढत होणार..? 

 या निवडनुकीचा निकाल सोलापूर जिल्ह्यातील विजयी फाॅर्मुला ४:३:१:१:१:१ असा राहणार  असल्याने मी आमदार होणार..? ही कुणा कुणाची मनोकामना पूर्ण होणार येणार काळच सांगणार असून तो पर्यंत सर्वच इच्छुक उमेदवार आमदार असणार आहेत.

           ही निवडणूक अनेकार्थाने मजेदार होणार असून अनेकजण मैदानात उतरणार असल्याने व जुन्या अनुभवी खेळाडु बरोबर नवीन अनेक  खिलाडी जोर, बैठका जोरात काढत असल्याने , कसरीतीचे अनेक प्रयोग चालू असल्याने 
अनेक मतदारसंघात यंदा सोलापूर सह राज्यात नवखे आमदार होणार ..!  अशा चर्चित गप्पांना उधाण आले आहे.  अशातच सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे तीन उमेदवार जाहीर झाले आहेत. इतर पक्षाचे दोन दिवसात उमेदवार जाहीर होऊ शकतात अत्यंत अखेरच्या क्षणी मतदारसंघाचे अदलाबदल होऊ शकते..? (वंचित आघाडी, मनसे, तिसरी आघाडी, मराठा आंदोलक उमेदवार) हे महत्वपूर्ण इफेक्ट करणार..! 

      "सध्या तरी सोलापूर जिल्ह्यात राज्यात महायुती जिल्ह्यात महाविकास आघाडी अशा समीकरणाच्या दृष्टीने वाटचाल असून राज्यात पुन्हा महायुती म्हणून चमत्कारिक आघाडी निर्माण होण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.,,
   इच्छुकांचे लक्ष उमेदवारी मिळण्याची दाट संकेत याचे रूपांतर डायरेक्ट उमेदवारीत केव्हा होईल याची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. 

Post a Comment

0 Comments