दि. १८/१०/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून जागा निश्चिती धोरण आखले जात आहे या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय गोरक्षा मंच साठी दोन विधानसभेच्या जागा द्या अशी मागणी गोरक्षा मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुरली लव्हाळे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेद्र फडणवीस यांच्या कडे केली असल्याची माहिती त्यांनी दुरध्वनी द्वारे दिली.
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना मागणी करते समयी राष्ट्रीय अध्यक्ष मुरली लव्हाळे
राष्ट्रीय गोरक्षा मंच मराठवाड्यातील दोन जागा लढवू इच्छित आहे. महाराष्ट्र शासनाने या पूर्वीच गाई ला राज्य गोमातेचा दर्जा दिला आहे त्या अनुषंगाने गोमातेचे संवर्धन आणि प्रसारासाठी अधिक उत्तम रीतीने होण्यासाठी विधानसभेत प्रतिनिधी का असू नये..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रीय गोरक्षा मंच उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ व साध्वी सरस्वतीजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत आहे. देशात व राज्यात आदर्श गोमाता पशुपालक आहेत , त्यांना स्वतंत्र मार्गदर्शन व्हावे अधिक गतिमान पध्दतीने प्रसार व्हावा यासाठी विधानसभेत प्रतिनिधीत्व असावे त्या साठी आम्ही , मराठवाड्यातील विधानसभेच्या दोन जागा देण्याची मागणी करत असल्याची माहिती श्री लव्हाळे यांनी दिली.
" त्याचबरोबर मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी ही या मागणी चा गांभीर्याने विचार करावा
अशी मागणी राष्ट्रीय गोरक्षा मंच व महाराष्ट्रातील गोमाता प्रेमीतून होत आहे. "
0 Comments