LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आज कारखान्यात " बाॅयलर " पेटला; दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनी निवडणूकीचे "रणशिंग" फुंकले...! हम भी है तयार चा संदेश गेल्याने चैतन्य फुलले..!

दि ११/१०/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क 

     दि. ११ आॅक्टोबर २०२४ रोजी माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक  यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे आमदार कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रशांतराव परिचारक,  व्हाईस चेअरमन श्री कैलास खुळे  माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे , कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी  सर्व विद्यमान संचालक माजी संचालक व सभासदाच्या वतीने पुष्पहार व फुले अर्पण करून  विनम्र अभवादन करण्यात आले.


        जयंतीचे औचित्य साधून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ३४वा अग्नि प्रदिपन सोहळा वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत  ही संपन्न झाला.
__________________________________________
  
तर दोन दिवसांपूर्वी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावे नाहीतर पंढरपूर तालुक्यातील मंगळवेढा तालुक्यातील अर्थात पांडुरंग परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता विधानसभेसाठी अर्ज भरेल अशा अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर परिवाराचे प्रमुख प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात गाव भेट दौरा सुरू केला आहे. 
यापूर्वीच काही निवडक गावात किंवा मध्यवर्ती ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने चाचणी केली होती. परंतु कार्यकर्त्यांचे समाधान होत नव्हते सध्या गाव दौरा आयोजित केल्याने 


हम भी है तयार..! असा इशारा दिला गेल्याने कार्यकर्त्यांच्या मनात चैतन्य फुलण्यास मदत झाली आहे.
 
अंतिम निर्णय थोड्याच दिवसात जाहीर होणार आहे..
कार्यकर्ते निश्चित काही तर बदल होईल असा विश्वास राखून आशादायी वातावरणाचा आस्वाद घेत आहेत.

Post a Comment

0 Comments