दि. ११/१०/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील कु. तेजश्री विठ्ठल कांबळे ( बी. टेक इलेक्ट्रीकल इंजिनिअर) यांची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर शिक्षक म्हणून शासनाच्या वतीने निवड झाल्याबद्दल "आनंदयोग हाॅस्पीटल" तर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. माधुरी मोरे यांनी पेढा भरवून पुष्पगुच्छ देऊन आनंदोत्सव साजरा केला. हे यश तिने अतिशय प्रतिकूल परस्थीत संपादन केले आहे त्याबद्दल विशेष कौतुक होत आहे
या वेळी डॉ. सुहास मोरे, छबाबाई कांबळे, लताबाई सोनटक्के, पल्लवी पांढरे यांच्या सह ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
_____________________________________________
0 Comments