दि.०७/१०/२०२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे दि.
८ ऑक्टोबर रोजी तर आज ७ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर येत आहेत विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यारंभ सोहळा प्रसंगी व लाडकी बहीण यशस्वी योजना या मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने विविध राजकीय धमाके ही उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांचा कार्यारंभ सोहळा प्रसंगी ते मंगळवेढा व पंढरपूर येथे उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजना पंढरपूर एमआयडीसी तामदर्डी बंधारा करंजाळ कचरा हुलजंती पौट निंबोणी नंदेश्वर गोणेवाडी रेल्वे चिंचाळे ते नॅशनल हायवे 166 पर्यंत रस्ता.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठ ऑक्टोबर 2024 रोजी सोलापुरातील मैदानावर होणाऱ्या महिला मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अनेक मंत्रीही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा म्हणून याकडे पाहिले जात आहे त्याचबरोबर विविध घोषणांचा निर्णयाच्या अंमलबजावणी च्या दृष्टीने अडचणी असल्यास उपाय योजना यावर विचार मंथन होण्याची शक्यता असून. सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रीय मतदारसंघाचा शिवसेना व महायुतीच्या दृष्टिकोनातून विचार होणची शक्यता आहे.
रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी शिवसेना नेत्या नीलम गो-हे ह्या सोलापूर दौऱ्यावर येऊन सोलापूर जिल्ह्याचा कानोसा घेऊन गेल्या आहेत..
सोलापूर जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघावर केला दावा.
0 Comments