LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

"धर्मा'च्या" राजकारणातील प्रवेशाने जिल्ह्यात अनेकांची होणार कोंडी...!? राज की बात

दि. २९/०९/२४
रविवार "राज" 'की' बात 
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-

समाज व्यवहारात नेहमी म्हटले जाते धर्मात राजकारण आणल्यास अथवा आल्यास सगळ्यांचाच खेळखंडोबा होतो पण् राजकारणात "धर्म" आल्यास दृष्ट नीतीचा नायनाट झाल्याशिवाय राहत नाही. इथे धर्म या संकल्पनेत नीतिमत्ता व न्याय अभिप्रेत ठरवले आहे. 
          सध्या सोलापूर जिल्ह्यात ही शहर व आजूबाजूचा परिसरही वेगळ्याच  "धर्म"राजा च्या भूमिके भोवती फिरू लागला आहे कारण या धर्माचा प्रभाव मोठा असल्याचे बोलले जात असून यापूर्वी निवडणुकांचा विचार केलाच प्रत्येक बहुतांश निवडणुकीत धर्माचा प्रभाव जाणवला आहे. कारखाना व वैयक्तिक संस्था वगळता राजकारणापासून दूर असणारे सिद्धेश्वर परिवाराचे नेते व सिद्धेश्वर  साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांचा दक्षिण सोलापूर शहर उत्तर व आजूबाजूच्या परिसरात जनसंवाद यात्रा चालू असून मोठ्या स्वरूपात प्रतिसाद मिळत आहे त्यांच्यामुळे 
 विस्कटलेले नेते एकत्र येऊ लागले  आहेत. त्यांनीही एरवी शांत घेतलेली भूमिका सोडून जनतेची इच्छा असेल आणि महाविकास आघाडीचे नेते खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व उद्धव ठाकरे,  आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या पक्षश्रेष्ठनी उमेदवारी दिल्यास आपण दक्षिणच्या समस्या सोडविण्यासाठी विधानसभेचे निवडणूक लढण्यास तयार आहोत असे स्पष्ट केले असल्याने त्यांचा म्हणजेच धर्मराजांचा राजकारणातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यांच्या प्रवेशाने दक्षिण सोलापूर, शहर उत्तर सह जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी इफेक्ट होऊ शकतो अनेक विरोधक महायुती च्या  उमेदवारांची कोंडी होवू शकते  अशी चर्चा जोर धरत आहे. त्यांनी विरोधाचा रोख भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांचेकडे ठेवला आहे हे जाहीर केले आहे.
        त्याचबरोबर रविवार २९ सप्टेंबर रोजी  अकलूज ता.माळशीरस येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री गृहमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त तरुण जेष्ठ नेते देशाचे माजी कृषिमंत्री    खा. शरदचंद्रजी पवार ( राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा)  यांच्या शुभहस्ते तर माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह जी मोहिते पाटील माजी राज्य कृषिमंत्री बाळासाहेब थोरात प्रमुख उपस्थिती राहणार असून यावेळी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार सोहळा ही संपन्न होत आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जुने व नवे नेतेगण तुतारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून विधान परिषद सदस्य असलेले रणजीतसिंह मोहिते पाटील यांचीही निश्चित दिशा ठरणार असल्याचं मानलं जात आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसू शकते अनेकजण तुतारी राष्ट्रवादी प्रवेश करण्याची त्याचबरोबर महाविकास आघाडीत समाविष्ट होणाऱ्यांची संख्या लक्षणीय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  परंतु हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम असून सर्वपक्षीय शेतीचे इतका च्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन असल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे
      त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत नवीन इच्छुक प्रबळ दावेदार लढण्यासाठी सर्वच पक्षातून उमेदवार तयार झाल्याने त्या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारां समोर एक प्रकारे "धर्म" संकटच उभे असल्याचे चित्र समोर येत आहे. हे धर्म संकट दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, माढा, मोहळ, पंढरपूर - मंगळवेढा, माळशिरस, सांगोला, करमाळा येथे गडद मानले जात आहे.  सोलापूर जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील व महाराष्ट्रातील  चित्र आजच्या अकलूज येथील होणा-या महाविकास आघाडीच्या सभेनंतर अधिक स्पष्ट होवू शकते असा जाणकारातून अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments