रविवार 'राज की बात'
दि. ०८/०९/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
सध्या सोलापूर जिल्ह्यात चार विधानसभा व दोन लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेला पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ विशेष चर्चेत आला आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या मतदारसंघाकडे आश्चर्यकारक राजकीय नजरेने पाहिले जात आहे. प्रयत्न केल्यास कांहीही घडू शकते असा संदेश देणारा हा मतदारसंघ असल्याने तीन व अधिकची झालेली पोटनिवडणूक अशा चार निवडणुकीत वेगवेगळ्या चिन्हाचे व पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्याच धर्तीवर पांडुरंग परीवारातील मोहीते पाटील समर्थक म्हणून गणले जाणारे सुमारे एक डझनभर पदाचे नेतृत्व केलेले नेते वसंतनाना देशमुखांनी २००९ च्या पसंतीचा मार्ग स्विकारला आहे. त्यांनी २९ आॅगष्ट रोजी कार्यकर्त्यांच्या विचार विनिमय बैठकीत तुतारी राष्ट्रवादी कडे विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी मागणी करतानाच पक्ष देईल त्या उमेदवाराचा( प्रशांत परिचारक असले तरीही ) प्रचारही करणार असल्याचे ही सांगीतले.
तसा प्रयत्न वसंतनानांसह अनेकांनी २००९ ला ही केला होता त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी चा उमेदवार बदला, आमच्या पसंतीचा उमेदवार द्या..! अशी मागणी करत वेगळा मार्ग स्विकारला होता. परंतु तेव्हाच्या राष्ट्रवादी कडून ऐनवेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली त्यांचेच समर्थक असलेले वसंत नानां हे पुन्हा मोहीते पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले. त्या वेळचा निकाल विरोधात गेला तरीही ते जिल्हात परिचारक प्रेमी व मोहिते पाटील समर्थक म्हणून राहीले आहेत. सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राहुल शहा, नागेश भोसले, भगीरथ भालके यांनी इच्छा व्यक्त केली आहे. भालके यांनी तर पक्षाचे तिकीट दिले नसले तरी निवडणुकीत उभा राहणार असल्याचे सांगितले आहे. तर आ.आवताडे यांनीही मला महाविकास आघाडीची आॅफर आली होती परंतु मी पक्षातर्फे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. माजी आ. प्रशांत परीचारकाचा पत्ता अजून खुला झाला नाही. तर शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे अनिल सावंतही शरद पवारांची भेट घेवून सभा घेत आहेत.
पूर्वीच्या एक संघ पंढरपूर विधानसभा मतदारसंघात २००४ ला सत्ताधारी आमदार गटात व विरोधातील गटात ही बंड झाले होते. ही लढत स्व. सुधाकरपंत परीचारक, स्व. राजुबापू पाटील, स्व. भारतनाना भालके अशी होवून परीचारक विजयी झाले होते.
२००९ च्या पुनर्रचनेतील पंढरपूर- मंगळवेढा हे तालुके १९९९ पासून राष्ट्रवादीचे बालेकिल्ले राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आहेत . तत्पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते.( तसे आघाडीचेच वर्चस्व) म्हणूनच आघाडी कडून विशेषता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. सन २०२१ ची विधानसभा पोटनिवडणूक ही तुल्यबळ झाली त्यावेळी महाविकास आघाडी सत्तेवर होती तरीही महायुतीचा विजय झाला होता. तेव्हाची व आत्ताची सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडी व महायुती यांची "समीकरणे" वेगळी झाली आहेत . त्यामुळे वरून आमदारकीचे सोपी स्वप्न पाहणाऱ्यां सर्वांनाच आतून ही निवडणूक अवघड जाणार असल्याचे बोलले जात आहे. पांडुरंग कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन राहीलेले संचालक असलेले वसंतनाना देशमुख यांनी २००९ च्या भूमिकेला पसंती दिल्याने व बंडाला तुतारीचा झेंडा हातात घेतल्याने ( जयसिंह मोहिते पाटील यांच्या कट्टर समर्थकांना न्याय देण्याच्या मागील वक्तव्याचा संदर्भ घेतल्यास) अनेकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असल्याने महायुतीतील भाजपला काही अंशी तणावपूर्ण वातावरणात तर तुतारी राष्ट्रवादीला उत्साहात टाकले आहे.
अतुल मोरे, ९८३४७५१९२०
0 Comments