लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
विधानसभा निवडणुकीतील प्रत्येक मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आपल्या परीने निवडणुकीचे मैदानातील रण तापवत आहेत त्याचाच प्रत्यय माढा विधानसभा मतदारसंघात येऊ लागला आहे. नुकतीच माढा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आमदार बबनदादा यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांचा विविध गावात दौरे चालू आहेत त्यातच नुकतेच माढा मतदारसंघातून इच्छुक असलेले पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी नुकत्याच कारखान्यावरील छोटेखानी कार्यक्रमात येणारा हंगाम योग्य रीतीने गाळप करण्याबरोबरच ऊसाला तीन हजार पाचशे दर जाहीर केला आहे हा दर जाहीर करत असताना त्यांनी देशात उच्चांकी गाळप करणाऱ्या कारखान्याला म्हणजे अप्रत्यक्ष आमदार बबनदादा शिंदे व त्यांचे पुत्र रणजितसिह शिंदे यांना
तुम्ही गाळपत प्रथम असाल तर आम्ही दरात प्रथम असू अशी घोषणा करत ऊस दराचा 3500 चा धक्का देत सर्वच कारखानदारांना हलवले आहे.
एक प्रकारे हा दर जाहीर करून त्यांनी विधानसभेचे अरण अधिक तापवले असल्याचे चित्र समोर येत आहे अजून कोणत्याच उमेदवाराचे पक्ष व चिन्ह याबाबत अतिशय गोपनीयता असून कोणालाच अपेक्षित असलेले चिन्ह व पक्ष मिळेल याची खात्री वाटेनाशी झाली आहे त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या परीने पक्ष वचन कोणताही असेना आपली तयारी असली पाहिजे म्हणून मोठ्या गतीने हालचाली चालवले आहेत त्यातच आजचा अभिजीत पाटलांचा ऊसदर जाहीर करण्याचा प्रकार म्हणजे एक पाऊल पुढे म्हणत रण अधिक गरम केले आहे
0 Comments