०७/०९/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क
माहिती अधिकार पत्रकार समितीच्या सचिवपदी स्वप्निल पोरे यांची निवड
नुकत्याच झालेल्या सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रिस सिद्दिकी सर यांनी माहिती अधिकार विषयी व पत्रकार विषयी मार्गदर्शन केले. गोरगरीब जनतेची होणारी आर्थिक पिळवणुक व आपण या पदाचा वापर गोरगरीब जनतेसाठी व समाजकार्य करण्यासाठी केला पाहीजे असेही ते म्हणाले. तसेच पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये पंढरपूर तालुका सचिव म्हणून स्वप्निल पोरे यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र व आयडी कार्ड देण्यात आले. या सर्व कार्यक्रमाप्रसंगी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments