LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नाविन्यपूर्ण उपक्रमांनी चळे परिसरात शिक्षक दिन साजरा

 दि. ०७/०९/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमानी साजरा झाला. 
रोपे वाटप

वृक्ष लागवडीचा ध्यास घेतलेल्या वृक्ष मित्र परिवाराने  गावातील सर्व शिक्षक, त्याचबरोबर चळे जिल्हा परिषद शाळा, श्री दर्लिंग  विद्यामंदिर व भास्करअप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय, श्रीकृष्ण महाविद्यालय, विविध वस्तीशाळा, गावातील विविध मंदिर परिसर, शिक्षकांना व ग्रामस्थांना शंकेश्वर कारंजा कडुलिंब बेल जांभूळ इत्यादी प्रकारचे रोपे भेट देऊन शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

चळे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने पंढरपूर तालुका क्रीडा स्पर्धेत थाळीफेक या स्पर्धेत दर्लिंग प्रशालेचे सुदर्शन राजू माने व प्रणिती सदाशिव शिखरे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावल्याने त्यानमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. 

 *  एक दिवस शिक्षकांसाठी 

गत तीन वर्षापासून चळे जिल्हा परिषद शाळेत एक दिवस शिक्षकासाठी हा उपक्रम राबवताना गावातील विविध सामाजिक कार्यात पुढाकार असणाऱ्या महिलांनी शाळेत येऊन एक दिवस ज्ञानदानाचे काम केले त्यामध्ये उज्वला वाघ, प्रियंका सटाले, आश्वीनी वाघ , राणी गायकवाड, अश्विनी वाघ, गीतांजली साळुंखे, चांदनी पंडित, पुनम मोरे,  सृष्टी मोरे, सौ.क्षीरसागर यांनी सहभाग नोंदवला. 

प्रत्येक वर्षी वेगळ्या गटाना संधी देण्याचा महिला कार्यकर्त्यांचा  प्रयत्न असल्याचे सांगितले.

 या वेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी समिती अध्यक्ष  अतुल सटाले, सदस्य सज्जन मोरे, अतुल मोरे, श्रीकांत पंडीत यांच्या सह सर्व  सदस्य उपस्थित  होते.
* परीवर्तन ग्रुप चे बालाजी फुगारे  यांच्या वतीने  सर्व शिक्षकांचा पेन  वाटप करण्यात आले
 त्याच बरोबर श्री दर्लिंग विद्या मंदिर व भास्करप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय व श्रीकृष्ण महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षक बनून ज्ञानदानाचे कार्य केले. 

 सर्वच शाळेतील विद्यमान कार्यरत शिक्षकांनी शिक्षक दिनानिमित्त  सहभागी झालेल्या  विद्यार्थी व ग्रामस्थांचे आभार मानले. 🙏
  


Post a Comment

0 Comments