लोकपर्व न्यूज नेटवर्क
मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे संभाव्य इच्छुक उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या मागणीनुसार मतदारसंघात शासनाचा कोटवधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी शासनाचा निधी आला नाही त्या ठिकाणच्या कामासाठी उद्योजक राजू खरे यांनी स्वनिधीचा वापर केला आहे स्व- नधीचा वापर करत विकास कामे सुरू करण्यात आली आहेत या विकास कामाचा प्रारंभ रविवारच्या शुभ मुहूर्तावर पूर्ण करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला ही आमदार नसतानाही केलेली विकास कामाचा प्रारंभे ही सर्वसामान्य जनतेला अधिकची खरे वाटू लागला आहे.
चळेगावासाठी ८० लाख नेपतगाव तीस लाख तर आंबे येथील ३५ लाख रुपये विविध कामाचा श्री गणेशा करण्यात आला.
त्याचबरोबर मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर या तालुक्यातील ज्या गावात अडचणी असतील तिथे शासनाच्या माध्यमातून व स्वतःच्या माध्यमातून "जिथे कमी तिथे मी " हा महामंत्र उद्योजक राजू खरे यांनी सध्यातरी खरा ठरवला आहे.
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील विकास कामाचा प्रारंभ करत असताना विठ्ठलचे माजी संचालक संतोष गायकवाड सरपंच सौ. शालन ज्ञानेश्वर शिखरे, उपसरपंच दीपक मोरे, ग्रामपंचायत सदस्य अतुल मोरे ,रणजीत सोनटक्के, बालाजी वाघमारे ,सुशील वाघमारे ,गोरख गायकवाड ,मंगेश गायकवाड अजय वाघमोडे, सुधाकर मोरे ,दर्लिंग फडतरे ,अमोल वाघमारे धनाजी माने ,,लखन वाघमारे, रुपेश वाघ, श्रीकांत पंडित अण्णासाहेब खिलारे, विजय वाघमारे , नेपतगाव येथील सरपंच आशाबाई परकाळे उपस्थित होत्या.
त्याचबरोबर आंबे, नेपतगाव , पुळुज गोपाळपूर या गावासह मोहोळ विधानसभा मतदार संघातील विविध गावातून कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments