LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चळे जि.प. केंद्र शाळेला 'आदर्श शाळा' पुरस्कार प्राप्त

दि. १७/०९/२४

लोकपर्व न्यूज नेटवर्क 
____________________

 पंढरपूर तालुक्यातील चळे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेस  नुकताच तालुकास्तरीय आदर्श केंद्र शाळा म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. 

            हा पुरस्कार बाळासाहेब काळे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था पंढरपूर या संस्थेच्या वतीने देण्यात येतो  २०२४ या वर्षाचा पुरस्कार चळे येथील जिल्हा  परिषद केंद्र शाळेस  प्राप्त झाल्याने सर्व पालक,  ग्रामस्थांतून स्वागत व अभिनंदनाचा  वर्षाव होत आहे. 
 महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य सल्लागार बाळासाहेब काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष जाधव पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ यादव चेअरमन मारुती शिरसागर उपाध्यक्ष बालाजी जमदाडे सचिव दत्तात्रय रोंगे यांच्यासह शाळेच्या वतीने
पुरस्कार स्वीकारताना मुख्याध्यापिका कल्पना जगताप, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अतुल सटाले, उपाध्यक्ष अश्विनी वाघ , सहशिक्षिका रेखा जाधव, सुलभा कुंभार, सहशिक्षक सतीश बुवा, प्रशांत ठाकरे, उपस्थित होते.

"हा पुरस्कार विद्यार्थ्याची वाढीव गुणवत्ता, शाळेतील ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वाढत जाणाऱ्या भौतिक सुविधा, शाळेतील सर्व शिक्षक व सर्व व्यवस्थापन समिती सदस्य यांचे असणारे प्रयत्न यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला असून यापुढील काळात ही निश्चितपणे अधिक  प्रगती होईल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होऊ लागला आहे".

Post a Comment

0 Comments