रविवार 'राज' की बात.
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
आज दिवसभर एकच चर्चा श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर माजी आमदार प्रशांत परिचारक व विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांचा एकत्रित सत्कार..!
निमित्त होते श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यास कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा कृतज्ञता सत्कार सोहळा दि. २१/०९/२०२४ रोजी आयोजित केला होता.
चेअरमन भगीरथ भालके यांच्यासह मंगळवेढा तालुक्यातील कारखाना निवडणुकीत समविचारी आघाडीत सहभायावेळी गत तीन विधानसभा निवडणुका विरोधात लढवलेले स्व. आमदार भारत भालके यांचे सुपुत्र व विठ्ठल चे माजीगी असलेले सर्व नेतेमंडळी उपस्थित होते, या कार्यक्रमातून असा संदेश पसरत गेला की पुढील काळात परिचारक व भालके समविचारीच्या माध्यमातून एकत्रित येतील काय.. निवडणूक लढवणार काय..? असा प्रश्न उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला.
कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून परिचारक भालके समविचाराच्या माध्यमातून एकत्रित आलेच होते आणि त्यापेक्षाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वीही पंढरपूर तालुक्यात माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक आणि स्वर्गीय आमदार भारत भालके हे बऱ्याच निवडणुकीत "वरूनही व आतूनही" एकत्रित आल्याची पार्श्वभूमी आहे. सध्या नवी वाटणारी परिचारक- भालकेची समविचारी युती ही
परिचारक- भालकेची जुनीच मांडणी आहे; मात्र नव्याने फोडणी दिली आहे..!
यापूर्वी पंढरपूर तालुक्यात २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी विठ्ठलचे चेअरमन असलेले भारत भालके यांनी शिवसेनेची उमेदवारी घेऊन सुधाकरपंत परिचारक यांच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. व त्यानंतरही झालेल्या पंढरपूर तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत परिचारक भालके एकत्रित आला होता. यांच्या विरोधात उर्वरित विठ्ठल परिवार असा सामना रंगला होता. त्यावेळी पंचायत समिती जिल्हा परिषद वर परिचारक भालके गटाची सत्ता येऊन सभापती पदी वसंतराव देशमुख व उपसभापती विजयसिंह देशमुख यांनी भूषवले होते. सध्या मात्र सर्वांचे मार्ग वेगळे आहेत.
" आमदार प्रशांत परिचारक हे अजून भाजपमध्येच आहेत त्यांनी एका एसएमएस द्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सहकार्याने दामाजी कारखान्याला ९४ कोटी रुपयाचे कर्ज दिल्याचे ते स्वतःच सांगत आहेत. तर भगीरथ भालके यांची निवडणूक लढण्याच्या दृष्टीने जनसंवाद यात्रा सुरू असून ते कोणत्या पक्षात जाणार हे निश्चित नाही तर पंढरपूर पंचायत समितीच्या सभापतीसह विविध पदे भूषवलेले वसंतनाना देशमुख हे खा. शरद पवार त्यांच्या तुतारी राष्ट्रवादीकडे तर उपसभापती विजयसिंह देशमुख हे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाकडे आहेत"माजी
जर यदा कदाचित समविचारीच्या माध्यमातून भालके परिचारक एकत्रित आले तर ते फारसे आश्चर्य वाटायला नको कारण "ती फक्त जुनीच मांडणी असणार ; मात्र नव्याने फोडणी"...! हे मात्र निश्चितच.
अतुल मोरे, ९८३४७५१९२०
0 Comments