रविवार, राज "की' बात
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय हालचाली वेगाने चालू झाले आहेत प्रत्येक जण आपल्या परीने मनात असलेल्या पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी पाण्यात देऊ ठेवून उभे असतानाच
सोलापूर जिल्ह्यात आज दोन दिग्गजांचा दौरा आयोजित असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी "रथी - महारथी" उपस्थित राहणार आहेत.
पहिला नियोजित असणारा दौरा म्हणजे खा.शरदचंद्र पवार अकलूज येथे विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथील जाहीर कार्यक्रमात सोलापूर सह पश्चिम महाराष्ट्रातील राज्यातील दिशादर्शक वातावरण ठरवण्याच्या मूडमध्ये आहेत. हा कार्यक्रम माजी मुख्यमंत्री गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा संपन्न होत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे हा कार्यक्रम माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात , तुतारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राज्यातील अनेक नेतेमंडळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर दुसरीकडे या कार्यक्रमास प्रति कार्यक्रम असावा म्हणून महायुती चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंढरपुरातील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत .
यावेळी जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार महायुतीतील सर्व नेते हे उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या एक लाख लाभार्थ्याची पूर्तता झाल्याबद्दल आभार व स्वागत समारंभ व पुढील दिशा महामंडळाची काय असेल यासंदर्भात चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला असून त्यांच्याबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील ही प्रमुख मार्गदर्शक राहणार आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राजकीय नेत्यांची मंदीयाळी असून दोन भरगच्च कार्यक्रमाकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे नेमके सोलापूर जिल्ह्यासह राज्यात काय घडामोडी घडणार चालू राहणार याचा निश्चितपणे उलगडा होऊ शकतो. राजकीय वातावरण महाविकास आघाडी व महायुतीतर्फे जैसे थे ठेवण्यास दोन्ही बाजूनी जोरदार प्रयत्न चालू आहेत यात कोण बाजी मारणार आगामी काळात ठरणार आहे
0 Comments