LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पांडुरंग कारखाना सर्व आव्हाने पेलण्यासाठी सक्षम:- प्रशांत परिचारक

दि. २६/०९/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क 
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना भविष्यातील सर्व आव्हाने पेलण्यासाठी व उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे असे प्रतिपादन चेअरमन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले ते वाखरी ता. पंढरपूर येथील कारखान्याच्या ऑफिस कार्यस्थळावर ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.


या वेळी नियोजनबद्ध ऊस उत्पादन घेणारे शेतकरी श्री प्रमोद नाईकनवरे व त्यांच्या कुटुंबीयांना पांडुरंग भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले त्याचबरोबर इतर ही अनेक शेतकरी बांधवांना  पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

कारखान्याला आजपर्यंत विविध पस्तीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून हे सर्व उत्पादक शेतकऱ्यांचे श्रेय आहे त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच वाटचाल यशस्वी असून विविध आव्हाने पेलू शकतो असे सांगून कारखान्याला सध्याच्या परिस्थितीवर वार्षिक अहवाल व आॅडीट रिपोर्ट आणि सद्यस्थितीवर कोणत्याही बँकेकडून साडेपाचशे कोटी रुपयांचे कर्ज मिळू शकते असा कारखाना सक्षम आहे. कर्जासाठी कारखाना इतर संस्था व एनसीडीसीच्या दारात उभा राहिला नाही याचा उल्लेख केला. 
कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन दिनकरराव मोरे,  व्हा. चेअरमन 
 कैलास खुळे, अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे,  माजी सभापती वामनराव माने,  सुभाष माने, बाळासाहेब देशमुख, दाजी  भुसनर, बाजार समितीचे सभापती हर्ष गायकवाड उपसभापती राजू गावडे यांच्या सह कारखान्सयाचे र्व संचालक उपस्थित होते.
* आगामी योग्य वेळ व परिस्थिती पाहून विधानसभा निवडणुकीची दिशा ठरवली जाईल असे सुतोवाच केले.
यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या राजकीय वाटचालीचा विविध पदावर कार्यरत असताना घेतलेल्या भूमिकांचा व यशस्वी कार्यशैली दर्शवणारी चित्रफित सादर करण्यात आली.
 

Post a Comment

0 Comments