LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षकांना शिकवू द्या.. मुलांना शिकू द्या ..! या मागणी खाली शिक्षकांचा उद्या संप; राज्यातील शाळा एक दिवस बंद राहणार..!

दि. २४/०९/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क 
शिक्षकांना शिकवूद्या...! मुलांना शिकू द्या..!


महाराष्ट्र शासनाच्या विरोधात शाळा व शिक्षकांच्या भरती बाबतच्या विविध प्रश्नांच मागणीबाबत उद्या राज्यभर संप पुकारला आहे यापूर्वीही शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकानी काळ्याफिती लावून कामकाज केले होते. अनेक शाळेतील  विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत ज्यांना मिळाले आहेत ते योग्य मापात नाहीत त्याचबरोबर अनेक शालेय इमारती व विद्यार्थ्यांना उपलब्ध असणारे साहित्य याची कमतरता आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांची पटसंख्यानुसार भरती नाही त्याची ताबडतोब शिक्षकांची भरती करावी कमी पटसंखेच्या शाळा बाबत आखलेल्या धोरणाबाबत पुनर्विचार करावा या व विविध मागण्यासाठी उद्या चळे ता. पंढरपूर येथील शिक्षकासह संबंध राज्यातील शिक्षक जिल्हास्तरावर एक दिवसाचा आंदोलन करणार आहेत त्यामुळे २५ सप्टेंबर रोजी शाळा एक दिवस  बंद राहणार आहेत. शिक्षकांच्या मागणीची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी शिक्षकासहित सर्व पालक वर्गातून होत आहे.
पंढरपूर तालुक्यातील चळे जिल्हा परिषद केंद्र शाळेतील सर्व शिक्षकाने २० सप्टेंबर रोजी शासनाच्या विविध धोरणाचा निषेध करत काळा भीती लावून कामकाज केले होते . सध्या ऑनलाईन सभा मिटींग आयोजन होत आहे अचानकपणे ऑनलाईन कार्यवाहीची पूर्तता करणे असा वरिष्ठ कार्यालयातून संदेश येतो त्यामुळे हातातील कामकाज सोडून ते काम करावे लागते त्याचबरोबर विविध कामे सुद्धा नियमबाह्य पद्धतीने करावी लागतात असे शिक्षकांचे म्हणणे असून शासनाच्या काही निर्णयचा निषेध नोंदवण्यासाठी चळे येथील शिक्षक २५ सप्टेंबर रोजीच्या संपात सहभागी होणार आहेत अशी माहिती शिक्षकांनी दिली.

Post a Comment

0 Comments