दि.२४ सप्टेंबर २०२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर ते चळे बी.एड. कॉलेज मार्गे बससेवा २३ सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली.
अनेक दिवसांपासून या मार्गावरून ही बस सेवा बंद होती. फक्त पावसाळ्यात बस वाहतुकीचा इतर मार्ग बंद झाल्यास या मार्गे बस वाहतूक करण्यात येत होती परंतु बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय व श्रीकृष्ण महाविद्यालय चळे या महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पंढरपूर तालुक्यातून भरपूर असल्याकारणामुळे बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय व श्रीकृष्ण महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बळीरामदादा बनसोडे यांनी तसेच माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे तालुका सचिव स्वप्नील पोरे यांनी पंढरपूर आगार व्यवस्थापकना दिवसातून तीन फेऱ्या बी.एड कॉलेज मार्गे सुरू करण्यासंबंधी निवेदन दिले होते. त्याला यश येत आज पासून बस सेवा पंढरपूर ते चळे बीएड मार्गे सुरु झाली.यामुळे आसपास गावच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येणे सोपे झाले. तसेच विद्यार्थ्यांमधून व चळे ग्रामस्थांकडून बस सेवा सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. या वेळी लाल परी ची पूजा करून वाहक चालक व बसवाहतूक नियंत्रक अष्टेकर यांचा महाविद्यालयाच्या वतीने व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी अष्टेकर यांनी लाल परीने अनेक प्रवासी योजना आणल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी योजना आणले आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
0 Comments