दि. ०९/०८/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे जिल्हा परिषद केंद्र शाळा ही एक उपक्रमशील शाळा बनली असून नेहमीच विविध उपक्रम राबवले जात असतात. महाराष्ट्र राज्य कृषी दिन, रौप्य महोत्सवी कारगिल विजय दिन, शिक्षण सप्ताह , विद्यार्थी, शिक्षक , विविध संघटना यांच्या वाढदिवस, वर्धापनदिना निमित्त तर्फे वृक्षारोपण , विविध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम होतात असाच एक अनोखा उपक्रम( लाडकी आजी... लाडकी बहीण) सात ऑगस्ट रोजी संपन्न झाला.
निमित्त होते जिल्हा परिषद चळे शाळेतील सहशिक्षक डॉ. प्रशांत ठाकरे यांनी त्यांच्या प्रज्ञा आणि तेजस्विनी या दोन मुलींच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील पोषण आहार तयार करून देणाऱ्या रुक्मिणी मुरलीधर कुंभार, राजाबाई तानाजी कुंभार ( सासू आणि सुन) या दोघींनाही लुगडे, साडी भेट देवून वस्त्रदान करून लाडकी आजी.. लाडकी बहीण.. हा उपक्रम एक प्रकारे संपन्न करण्यात आला.
प्रशालेतील सहशिक्षिका सुलभा कुंभार यांच्या हस्ते तर केंद्रप्रमुख मारुती काळुंगे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अतुल मोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश बुवा, विकास बढे, आण्णासाहेब रायजादे , रेखा नागणे, उषा खांडेकर परीश्रम घेतले.
यावेळी केंद्रप्रमुख श्री एम.डी. काळुंगे यांनी सध्या हवामानातील बदलामुळे विविध आजार वाढल्याने विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयावर विचारमंथन केले विद्यार्थ्यांना चर्चेत सहभागी करून घेतले.
0 Comments