* नादुरुस्त रस्त्यामुळे पावसाळ्यात बस वाहतूक खोळंबते
* अनेक आंदोलने करूनही दुर्लक्ष
* चळे ग्रामपंचायतीचे सोमवार पर्यंत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन
दि.२३/०७/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क :- पंढरपूर तालुक्यातील चळे ते कोंढारकी या रस्त्याची दुरवस्था झाली असून गेल्या दोन वर्षांपासून रस्ता दुरुस्तीची मागणी होवूनही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही.
अगदी गत वर्षी विद्यार्थ्यांनीनी व बचत गट महिला सदस्यांनी आमदाराची गाडी अडवून रस्त्याची मागणी केलेला व्हिडिओ सुध्दा मोठ्या प्रमाणात सोशल मिडिया व्हायरल झाला होता. त्या वेळी आमदारांनी तातडीने दखल घेतली होती परंतु पुन्हा प्रशासनाचे येरे माझ्या मागल्या...या म्हणी प्रमाणे अवस्था झाली आहे. निधी मंजूर आहे की नाही.?..झाला असेल तर कोठे गेला..?. अन् झाला नसेल तर केव्हा होणार..? असे ना..ना.. विविध शंका उपस्थित करणारे प्रश्न चळे, कोढारकी परीसरातील नागरीकातून चर्चिले जात आहेत.
एक महिण्या पूर्वी कोढारकी येथील विद्यार्थी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी कोंढारकी ते चळे या रस्त्याला निधी मंजूर केंव्हा होणार..? बस वाहतूक सुरळीत केंव्हा होणार ..? या बाबत आवाज उठवला होता. म्हणजे नेमके पाणी कोठे मूरते आहे याबाबत कोणालाच कोणताच अंदाज लागणेसा झाला आहे.
तर २२ जुलै रोजी चळे येथील दर्लिंग प्रशाला येथे शिक्षण घेत असलेल्या कोंढाराकीतील विद्यार्थ्यांनी चळे ग्रामपंचायत प्रशासनास अखेरचे निवेदन दिले की तुम्ही तरी रस्त्याचे काम पूर्ण करा... एसटी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य करा.. आमच्या शिक्षणाची वाट मोकळी करा..! अशा आशयचे निवेदन देऊन
रस्ता न झाल्यास उपोषणाचा ही इशारा दिला होता.
त्या पार्श्वभूमीवर चळे ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यांनी सोमवार दिनांक २९ जुलै पर्यंत रस्ता दुरुस्त करून बस वाहतुकी योग्य त्याचा करण्याचे आश्वासित केले आहे.
* आठ दिवसांत रस्ता न झाल्यास आम्ही सर्व कोंढारकी येथून येणारे विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार.
----+ कोंढारकीचे विद्यार्थी
* सदर रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन चळे ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. शालन शिखरे व ग्रामपंचायत सदस्यानी दिले आहेत काम पूर्ण नाही झाल्यास उपोषणाचा अवलंब करण्यात येईल.
एस.डी. मोरे , चळे ग्रामस्थ
एक धोका टाळताना दुसरा धोका उत्पन्न..!
चळे ते कोंढारकी हा पाच किलोमीटर रस्ता आहे हा रस्ता पावसाळ्यात पुर्णपणे चिखलात समाविष्ट होतो त्यामुळे एस .टी पुर्णपणे चिखलात रुतून बसते ..एका बाजूला कलते मोठ्या अपघात होण्याची शक्यता असल्याने या रस्त्यावरील बस वाहतूक थांबवली जाते. परंतु एक धोका टाळताना दुसरा धोका तयार होतो. कारण बस वाहतूक थांबवल्यानंतर या कोंढारकी गावातून चळे गावाकडे सुमारे 300 विद्यार्थी शिक्षणासाठी येतात त्यांच्या शिक्षणाचा नादुरुस्त रस्त्यामुळे व "रस्ता नसल्यामुळे थांबलेल्या बसवाहतुकीमुळे" पूर्णपणे शिक्षणाचा खेळखंडोबा होतो. विद्यार्थ्यांना शिक्षकांचं उशीर झाल्यामुळे बोलणे ऐकून घ्यावे लागते. म्हणून विद्यार्थ्यातून एकच मागणी जोरात होत आहे 'एक तर पक्का रस्ता करा..बस वाहतूक सुरळीत करा' नाहीतर शाळा आमच्या गावात आणा..!
0 Comments