दि.२०/०७/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
यंदा आषाढी वारीत भक्तांचा मळा जोरात फुलत जात असतानाच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत२०२३ पासून सुरू करण्यात आलेल्या आरोग्याची वारी.. पंढरीच्या दारी या या उपक्रमात ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे वारकऱ्यांचा सहभाग वाढतानाच त्यांना लाभ अनेक ठिकाणी होताना दिसला.
वारकरी आरोग्य सेवेसाठी आल्यानंतर त्याच्यासाठी उभारण्यात आलेला मंडप .
या आषाढी वारीत महा आरोग्य शिबिरा मार्फत विविध ठिकाणी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आलेली होती पालखी तळ वाखरी, तीन रस्ता चौक सोलापूर बार्शी रोड, 65 एकर परिसर, आणि गोपाळपूर विष्णुपद मंदिराशेजारी अशा विविध ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.
या वारीत विविध ठिकाणाहून आलेल्या वारकऱ्यांना कोणत्याच सुविधा अपुऱ्या पडू नयेत याची दखल घेतली जात होती,वारकरीनीही आपल्याला असणाऱ्या आजाराची तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबीराकडेही देखील ओढ ठेवली आहे म्हणून तर आरोग्य शिबिराकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात रांगा दिसून येत होत्या .
लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेले दर्शन रांगेप्रमाणे उभे असलेले वारकरी.
काही इमर्जन्सी निर्माण झाल्यास रुग्णवाहिका सेवेला तत्पर ठेवली होती. कॅन्सर रोगावरील डायग्नोस्टिकचे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. या उपलब्ध केलेल्या सर्व सेवांचा वारकरीही मुक्त पणे लाभ घेतला . कितीही गर्दी असल्यास रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देण्याचाही प्रत्यय दिसून येत होता एकूणच आरोग्याची वारी... पंढरीच्या दारी.. घडतेलेय भारी....! याचेच प्रचिती याची डोळ्याची देही..याची डोळा..! वारकऱ्यां बरोबर सर्व सामान्यांना ही प्रचिती आली.
असून या शिबिरा करता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी सेवा यावर्षीही चालू ठेवल्याबद्दल वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे त्याचबरोबर हे सेवा निरंतर घडो अशी अपेक्षा ही व्यक्त होत आहे.
* १४ लाखावरी भाविक लाभकारी..!
विक्रमी स्वरूपात भरलेल्या आषाढी यात्रेत यंदा पालखी मार्गसह पंढरपूर मध्ये भाविकांच्या सोयीसाठी मोफत आरोग्य सेवा राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली होती एकादशीपर्यंत १४ लाखाच्या पेक्षा अधिक वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे आरोग्य तपासणी व उपचाराचा मागील वर्षाचा विक्रम मोडीत निघाला आहे. ही सेवा १५ ते १९ जुलै या कालावधीत चालू होती.
* गर्दीत ही ॲम्बुलन्स ला वाट मोकळी करून देताना वारकरी
0 Comments