LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चळे जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिक्षक समिती वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

 दि. २२ जुलै, २०२४
 लोकपर्व न्यूज नेटवर्क:- पंढरपूर तालुक्यातील चळे जिल्हा परिषद केंद्र शाळेत २२ जुलै १९६२ साली स्थापन  झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक कृती समितीच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. प्रारंभी या सर्व स्पर्धांचे व कार्यक्रम उद्घाटन केंद्रप्रमुख मारुती काळुंखे व व्यवस्थापन समितीचे सदस्य अतुल मोरे यांनी पेन उंचावून केले. 


चित्रकला स्पर्धेतील चित्रकला रंगभरण स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रत्येक वर्गातून एक ते तीन क्रमांकावर निवडण्यात आले. त्याचबरोबर शाळेच्या परिसरात महाराष्ट्र शासनाने या वर्षी प्रोत्साहित केलेला बांबू लागवडीचे प्रतीक म्हणून बांबू चे रोप लागवड करण्यात आले.

  स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांना  श्रीकांत पंडीत, पेंटर नवनाथ वाघमारे, नितीन  वाघमारे मुख्याध्यापिका  सौ. कल्पना भुसे  यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी शाळेतील शिक्षक  आण्णासाहेब रायजादे (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिक्षक समिती, सोलापूर) डॉ. श्री प्रशांत ठाकरे सर, श्री सतिश बुवा सर, श्री विकास बढे सर, सौ. स्वाती नागणे  सौ. राणी गायकवाड, श्रीमती सुलभा कुंभार  यांनी परिश्रम घेतले.  सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

गुरुपौर्णिमा व शिक्षण सप्ताह प्रारंभ 

 या वेळी २१ जुलै गुरूपौर्णिमा रविवारी झाली असल्याने  व २२ जुलै ते २९  जुलै  शिक्षण सप्ताह साजरा होणार असल्याने सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्गात सामूहिक वाचन केले तर शिक्षकांना गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक शिक्षकाला वर्गातर्फे एक पेन व  पुष्प देवून गुरु - शिष्य नात्याचा ऋणानुबंध जोपासण्यात आला. हा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती तर्फे घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments