दि.१४जुलै, २०२४
लोकपरर्व न्यूज नेटवर्क;- पंढरपूर तालुक्यातील चळे जिल्हा परिषद केंद्र शाळेने १३/०७/२४ रोजी सलग या वर्षीही सुंदर आषाढी वारी व वारकरी दिंडीचे आयोजन केले होते या वारकरी दिंडीमध्ये विविध संतांच्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी लक्ष आकर्षित करून घेतले.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावतामाळी संत जनाबाई, संत मुक्ताबाई , वेशभूषा परीधान करत.
ग्यानबा... तुकारामाचा जयघोष करीत
महादेव चौकात आल्यानंतर वारकरी रिंगण ,वारकरी फुगडी खेळत हुबे वारीचे दर्शन घडवत जागोजागी होणारे ग्रामस्थ तर्फे स्वागत स्वीकारत.
ही वारी महादेव चौक विठ्ठल रुक्मिणी चौक हनुमान चौक , गावातील सर्व भजनी मंडळाचा सहभाग घेत विविध पताका खांद्यावर घेत विविध विषयाचा प्रबोधन पर फलक हातात घेत आषाढी वारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व्यवस्थापन समिती सदस्य यांनी वारीचा सहभाग नोंदवत आस्वाद घेतला.
या वारीत बाल वारकरी यांनी जमेल तसा पोशाख परिधान करत वारकरी धर्माची भगवी पताका उंच फडकावत.. सोबत टाळ चिपळ्याचा आवाज घुमवत .... वारीचा आनंद लुटत अधिक उल्लासीत होत , आम्ही ज्ञानाचे वारकरी... ज्ञानदीप लावू जगी... यशाचा झेंडा फडकवू डौलाने यांची जणू साक्ष देत. भगवान पांडुरंग की जय ..! आवाज घुमवला.
* ज्ञानदीप शाळेचाही सहभाग
चळे ता. पंढरपूर येथील ज्ञानदीप या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने ही उत्साह दाखवत संतांचे वेशभूषा करत पालखी मिरवणूक काढली. या श्रेणी ही समाज प्रबोधन पर फलकतात घेत गावातून मिरवणूक काढत लक्ष वेधून घेतले.
0 Comments