पंढरपूर महावितरण अधिकार्यांचा चळे येथील शेतकर्यांना हलगर्जीपणाचा शॉक : शेतकऱ्यातून प्रचंड नाराजीचा सूर
पंढरपूर
लोकपर्व न्यूज नेटवर्क:- गेल्या दोन महिन्या पूर्वी चळे महावितरण येथील पॉवर ट्रान्सफार्म जळाला होता. जळालेला तो ट्रान्सफार्म आणण्यासाठि एक महिना वेळ लागला. या दरम्यान शेती पिकासा ठि फक्त दोनच तास विज पुरवठा केला होता. या दरम्यान लाखो रुपयांचे शेती पिकाचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार महिवितरणचे अधिकारीच आहेत. परंतु मोठा पॉवर ट्रान्सफार्म बदलून आणला परंतु तो हि नादुरूस्तच आहे. त्यामुळे ऐन पावसाळयात पुन्हा एखदा शेतकर्यांचा शेतीसाठि विज पुरवठा खंडित होणार आहे. पॉवर ट्रान्सफार्म मध्ये हालगर्जी केल्या प्रकरणी महावितरणच्या अधिकार्यांना जबाबदार धरून त्यांना निलंबित करण्याची मागणी चळे येथील शेतकर्यां कडून होत आहे. तसेच उन्हाळ्यात पॉवर ट्रान्सफार्म जळाल्याने झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने करून सबंधित महावितरण अधिकार्याकडून कडून भरपाई घेण्याची मागणी होत आहे.
0 Comments