२०/०४/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:- पंढरपूर तालुक्यातील चळे जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येणाऱ्या इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत(ITSE) चळे केंद्रशाळेतील इयत्ता तिसरीच्या व चौथीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. कु. सिद्धी बालाजी शिंदे हिने आयटीएसई मध्ये 300 पैकी 266 तर गुण मिळवून जिल्ह्यात पाचवा क्रमांक तर मंथन परीक्षेत २४२ गुण प्राप्त करून केंद्रात द्वितीय क्रमांक मिळविला. तर कु. प्रणाली मोहन वाघ व रणजीत राहुल कुंभार या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 254गुण मिळवून आय टी एस ई परीक्षेत पंढरपूर केंद्रात प्रथम क्रमांक तर मंथन परीक्षेत अनुक्रमे २३४ व २२० गुण मिळवित केंद्रात तृतीय व विशेष प्राविण्य मिळवले.
चळे जि.प. शाळेतील आयटीएसी व मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी रणजीत कुंभार, सिद्धी शिंदे, श्रवण कोळी, प्रणाली वाघ
वरील विद्यार्थ्यासह श्रवण सिताराम कोळी (तिसरी) २२८ गुण मिळवून केंद्रात चौथा आदित्य अमोल रणवरे( चौथी)
२२४ गुण केंद्रात ६ वे स्थान मिळवून गुणवत्ता यादीत यश मिळवले.
आदित्य अमोल रणवरे
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री. विकास बढे व सतिश बुवा यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक,गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे,केंद्रप्रमुख श्री.मारुती काळुंगे,मुख्याध्यापिका सौ. कल्पना भुसे, शिक्षक सतीश बुवा,अण्णासाहेब रायजादे,प्रशांत ठाकरे, एकनाथ सुतार, स्वाती नागणे, सुलभा कुंभार यांनी अभिनंदन केले.या यशामुळे शिक्षक पालक व व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नामुळे जिल्हा परिषद शाळा कडे विद्यार्थ्यांचा व पालकांचा प्रवेशासाठी ओढा वाढल्याचे दिसून येत आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ६ वर्षे पूर्ण असणा-या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी पाल्याच्या जन्म दाखला व आधार कार्ड सहीत जिल्हा परिषद शाळा शिक्षक व व्यवस्थापन समितीकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे
फोटो :- चळे जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विविध परीक्षेत यश मिळवणारे विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक
0 Comments