०७/०४/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:- पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर ते कोंढारकी गावाकडे जाणारा हा रस्ता लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी पाचशे मीटर पर्यंतचा रस्त्याचा भाग दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आला होता व ताबडतोब रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली होती नूतनीकरण केले हे होते परंतु संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्त करत असताना डांबराचा अत्यल्प वापर करण्यात आला होता किंवा काही ठिकाणी डांबरच वापरले गेले नव्हते . पुन्हा हा रस्ता खड्डेमय बनण्याची अवस्थेत येणार होता व नुसतीच खडी पसरली असल्यामुळे मोटरसायकल स्वारांचा अपघात होण्याची शक्यता वाढली होती.
डांबर न वापरताच नुसतीच खडी पसरलेला रस्ता
या संबंधित निकृष्ट रस्त्याच्या कामा बाबत
लोकपर्व न्यूज नेटवर्कने. "हे वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित रस्त्याबाबतच्या ठेकेदाराने व प्रशासनाने लागलीच दखल घेत रस्त्याच्या त्रुटी दुरुस्ती केल्या. रस्त्यावर पसरलेली अनावश्यक खडी बाजूला करत योग्य त्या प्रमाणात डांबराचा वापर करत पुन्हा त्यावर खडी पसरली त्यामुळे ती खडी रस्त्याला चिकटून बसली त्यामुळे सुरळीत वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे या घटनेबद्दल प्रशासनाचे संबंधित ठेकेदाराने घेतलेल्या भूमिकेबाबत सर्व स्तरातून स्वागत होत आहे".
संबंधित वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दखल घेवून केलेल्या कामास प्रारंभ.
लोकपर्व मधील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने व प्रशासनाने लागली दाखल घेऊन योग्य प्रमाणात डांबर मिश्रित खडीचा थर देऊन रस्ता प्रमाणित केला.
* कोंढारकी - चळे पर्यंतचा हा संपूर्ण रस्ता दुरुस्त करावा नागरिकांची अपेक्षा.
गोपाळपूर ते कोंढारकी कडे जाणारा हा रस्ता केवळ पाचशे मीटर पर्यंत दुरुस्त करण्यात आलेला आहे परंतु हा रस्ता तसाच पुढे मुंडेवाडी फाटा, कोंढारकी, चळे पर्यंत हा रस्ता जातो. हा बारा किलोमीटर रस्त्यापैकी केवळ अर्धा किलोमीटर रस्ता दुरुस्त केल्याने संपूर्ण रस्ता दुरुस्त व्हावा अशीही अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे आणि हा रस्ता चळे या गावाच्या पुढे आंबे, सरकोली, पर्यंत ही जातो त्यामुळे या संपूर्ण रस्ता एका टप्प्यात दुरुस्त करण्यासाठी भरीव आर्थिक तरतुदीची गरज असून निवडणुकीनंतर शासनाने या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे असे अपेक्षा गोपाळपूर, मुंढेवाडी, कोंढारकी, चळे ,आंबे, सरकोली येथील नागरिकांतून होत आहे.
0 Comments