०६/०४/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क :- पंढरपूर तालुक्यातील चळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ मेघा दीपक मोरे यांची बिनविरोध निवड झाली विशेष म्हणजे चळे ग्रामपंचायतच्या इतिहासात प्रथमच उपसरपंच पदी महिला सदस्याची निवड झाली. यापूर्वीच एक वर्षापूर्वी सरपंचपदी शालन ज्ञानेश्वर शिखरे यांची निवड झाली होती.
आता उपसरपंच पदी सौ मेघा दीपक मोरे यांची निवड झाल्याने व सरपंच व उपसरपंचपदी महिला सदस्या विराजमान झाल्याने ग्रामपंचायतचे सूत्रे महिला वर्गाकडे सुपूर्द झाली आहेत.
विद्यमान ग्रामपंचायतच्या कालखंडात एकूण नऊ महिला ग्रामपंचायत सदस्य आहेत तर चार पुरुष ग्रामपंचायत सदस्य आहेत.
या निवडीनंतर सरपंच शालन शिखरे यांनी नूतन मेघा मोरे यांचा सत्कार केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या माजी सरपंच वंदना सोनटक्के, सुनंदा वाघमारे, सुवर्णा कुंभार, अर्चना गायकवाड, दिपाली गायकवाड, नंदा बनसोडे संगीता वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य अतुल मोरे, चरणदास कोळी, बापूसाहेब सरीक ग्रामसेवक रमेश कोळी, उपस्थित होते. उपसरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला नूतन उपसरपंच यांचा सत्कार पांडुरंग चे माजी चेअरमन दिनकरराव मोरे विठ्ठलचे माजी संचालक ज्ञानेश्वर गायकवाड, चळे चे माजी उपसरपंच भास्करराव मोरे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments