३१/०३/२४
रविवार विशेष
रंग राजकारणाचा
लोकपर्व न्यूज नेटवर्क:- देशातील लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एक महिना अगोदरपासूनच सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ गाजतोय..! शुभेच्छुक उमेदवारी पासून ते दावेदारीपर्यंत आणि उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतरही माढा मतदारसंघ नुसता राजकीय धुळवडीने कधी रंगीन होतोय.. कधी बेरंगी होतोय..! सध्या माढा मतदारसंघ मात्र रंगपंचमीच्या सणात महाराष्ट्राच्या राजकीय रंगपंचमी मात्र नाहून निघाला आहे विविध तर्क..वितर्क झाले. माढा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असल्याने भाजपकडून दोन सिंह महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्यास इच्छुक होते . दोन इच्छुक सिंह पैकी विद्यमान खासदार असणारे फलटणचे रण..जित..सिंह नाईक - निंबाळकर यांना पुनश्च तिकीट देण्यात आले. त्यामुळे दुसरे इच्छुक सिंह फॅमिली मधले अकलूजचे विजय-सिंहाचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अकलूजकर सिंहाच्या राजकारणातील रणनीती कार जय-सिंह यांनी माढा लोकसभा लढवण्या बरोबरच सोलापुरातून कमळ "कलम" करण्याचा संदेश दिला होता. तेव्हाच अकलूजच्या सिंहाची दिशा स्पष्ट झाली होती.
आता या घोषणाची पूर्तता होणार का..? या दिशेने सोलापुरी जनता विचार करू लागली आहे. कारण याच अकलूज च्या सिंह फॅमिली मधील विधान परिषदेचे आमदार 'रण जीत सिंह' यांच्यासमोर कुटुंबाच्या बाजूने की कुटुंबाच्या विरुद्ध अशा द्विधा मनस्थितीत वावरत आहेत. यापूर्वीही उमेदवारी घोषित झाल्यानंतर अकलूजच्या शिवरत्न वर कार्यकर्त्याचा गोतावळा ही जमला होता लढण्याचे नारे ही दिले होते भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही परिस्थितीची माहिती घेऊन वरिष्ठ विभागाकडे कळवली होती. परंतु पक्षातून ही कोणताच संदेश बाहेर आला नाही आता पुन्हा एकदा शनिवारी गिरीश महाजन हे विजय सिंह दादाच्या भेटीला येणार असल्याची माहिती प्रसारित झाली होती. परंतु नेमके काय होणार..? हे अनिश्चिततेच्या लिफाफ्यात अडकून पडले आहे.
निवडणुकीचे वातावरण तापले आहे.. अकलूजच्या सिंह कुटुंबाकडून मतदारसंघातील लोकांच्या भावना आणि मते ही जाणून घेतले आहेत जय सिंह आणि आता माघार नाही कोण लढत नसेल तर मी लढणार अशी "डरकाळी" फोडून झाली आहे मग काहीही झाले तरी आता माघार कसे..? असा प्रश्न प्रेमी मंडळींना पडला आहे त्यातच धैर्यशील यांना तुम्ही लढा असे धैर्यपूर्ण इशारे अनेक ठिकाणाहून मिळाले ही आहेत. परंतु या लढतीमुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे 'राज धर्म' संकटात येणार का.? कारण ते भाजपचे विधान परिषदेचे सदस्य आहेत असे मत मतांतरे मांडली जात आहेत.
तर दुसरीकडे राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगत असताना महाविकास आघाडीमध्येच महाराष्ट्रात पाच ते सात ठिकाणी काँग्रेस उबाठा शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या गटात मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत दिले आहेत किंवा जाहीरही झाले आहे त्याच पार्श्वभूमीवर माढा मतदारसंघात "भाजप विरुद्ध भाजप" अशी मैत्रीपूर्ण लढत दोन सिंहात होऊ शकते काय..? याचाही अंदाज जाणकारातून बांधला जात असून तशी चर्चाही जोर करत आहे.
सध्या माढा मतदारसंघात महायुती विधानसभा सदस्याच्या संख्येने मोजमाप केल्यास महायुती मतदारसंघात अधिक दाखवत असली तरीही या मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील हेच मजबूत स्थितीत आहेत असल्याचे बोलले जात आहे कारण मागील तीनही निवडणुका आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीचा विचार करता 2009 च्या लोकसभा निवडणुकीत खुद्द खासदार शरद पवार जरी असले तरी त्या संपूर्ण निवडणुकीचे सारथ्य विजय दादांनी केले आणि 2014 च्या निवडणुकीत खुद्द विजय दादांनी विजय संपादन केला आणि विशेष बाब म्हणजे 2019 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आव्हान स्वीकारून स्वतः भाजपमध्ये प्रवेश करून रणजितसिंह नाईक निंबाळकर नाही भाजपमध्ये आणून माळशिरस तालुक्यातून सव्वा लाखाचे मताधिक्य देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले मताधिक्याचे वचन पूर्ण करून माढा मतदारसंघावर विजयी कमळ फुलवले आणि माळशिरस तालुक्यातील विद्यमान आमदार राम सातपुते हे परिचित नसताना.. नवखे असूनही केवळ भाजप पक्षांने, देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छे खातर राम सातपुते यांना आमदार केले. हे अकलूजच्या विजयसिंह फॅमिली मुळेच हे नाकारता येणार नाही. मोहिते पाटील यांच्या निर्णयाचा फटका संपूर्ण सोलापूर जिल्ह्या बरोबरच आजूबाजूच्या पश्चिम महाराष्ट्रावर काही प्रमाणात का होईना होऊ शकतो..? तसा अंदाज ही बळावत चालला आहे..? त्यामुळेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पुन्हा च्या भेट घेण्याची हवा.. हवेतच विरली आहे.
विजयसिंह मोहिते पाटील हे आता नेमकी कोणती भूमिका घेणार..? अपक्ष... तुतारी..की... मैत्रीपूर्ण लढत..? हे पर्याय त्यांच्यासमोर उभे आहेत.
0 Comments