लोकपर्व न्यूज नेटवर्क :- अ कलूजसह सध्या महाराष्ट्रात अनेक राजकीय घडा- मोडी वेगाने घडल्या आहेत..घडत आहेत ... घडणार आहेत..? अशा संकेत देवू लागल्या आहेत. १९९९ साली खा. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना केली त्यावेळी जिल्ह्यातील बहुतांश एखादा दुसरा अपवाद सोडून सर्व आमदार विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या सह सर्व काँग्रेस मध्ये होते. सोलापूर जिल्हासह विजयदादा समर्थक इतर जिल्ह्यांतील काही आमदार यांच्या सह विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली खा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सामील झाले होते सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला २००९ पर्यंत राहिला होता.
आता सध्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने खा. रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांना तिकीट जाहीर केले आहे. त्यामुळे माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते - पाटील समर्थक कमालीचे नाराज असल्याचे दिसून येत आहेत. रविवार १७ मार्च रोजी शिवरत्न बंगल्यावर अनेक नेत्यांची मांदियाळी दिसून आली. शेकापचे जयंत पाटील, सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख, फलटण चे रामराजे निंबाळकर, करमाळ्याचे नारायण - पाटील , यांच्या सह अनेक नेत्यांची वर्दळ चालू असल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे अशांत वातावरण शांत करण्यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे ही शिवरत्न वर आले होते.
फलटण चे रामराजे निंबाळकर यांनी विजयदादा चे आमच्यावर उपकार आहेत...मी स्नेहभोजनासाठी आलो होतो. राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले .
शेतकरी कामगार पक्षाचे राज्यातील नेते जयंत पाटील यांनी ही आगामी दहा - पंधरा दिवसात राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडतील ...? असा अंदाज वर्तवला आहे.
मोहिते पाटील समर्थक कार्यकर्ते धैर्यशील मोहिते पाटील यानी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी असा आग्रह धरुन आहेत.
मंत्री गिरीश महाजन यांच्या शी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शी रात्री ९.३० पुढे पर्यंत शिवरत्न वर चर्चा चालू च होती.
मोहिते पाटील यांनी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना नेते, आमदार, खासदार बनवले असल्याच्या प्रतिक्रिया.
दोन लाखांचे मताधिक्य देवू म्हणणारे आ. संजयमामा शिंदे हे लोकसभेला का पडले ...? मोहिते पाटील कार्यकर्त्याचा सवाल.
अकलूज मध्ये शिवरत्न बंगल्यावर न बोलवताही कार्यकर्त्यांची गर्दी
गिरीश महाजन व मोहिते पाटील कोणता संदेश देणार उत्सुकता शिगेला..?
0 Comments