अतुल मोरे/ लोकपर्व न्यूज नेटवर्क :- सो लापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक पूर्ण करणाऱ्या आमदार प्रणिती ताई शिंदे यांना राष्ट्रीय काँग्रेसने सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना मागील दोन लोकसभा निवडणुकीत झालेला काँग्रेसचा आणि आपल्या कुटुंबियांचा झालेल्या पराभवाचा वचपा घेण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.
सोलापूर लोकसभेची लढत आ. राम सातपुते (भाजप) विरुद्ध आमदार प्रणिती शिंदे ( काँग्रेस)
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्याधारी भाजप मित्र पक्षाचे पाच आमदार जरी असले तरी त्यांचे विषयी नाराजी मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागली आहे.
जरी या पाच विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी तेथे विरोधी पक्षाचे उमेदवार ही क्रमांक दोनवर होते हेही विसरून चालणार नाही आणि मराठा आंदोलन हे कोणत्या वळणावर जाऊन ठेवेल हे कोणालाच सांगता येणार नाही.
अशी परिस्थिती संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे. काँग्रेसने उमेदवारी घोषित करण्यापूर्वीच आमदार प्रणिती शिंदे व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मतदारसंघातील सर्वच तालुक्याचा काही प्रमाणात संपर्क दौरा करून काही प्रमाणात मागोवा घेतला आहे.
काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे, भाजपचे जय सिद्धेश्वर महास्वामी, वंचित चे प्रकाश आंबेडकर २०१९ ची निवडणूक ( संग्रहित छायाचित्र)
जिथे गो बॅक निदर्शन केले तिथेच काँग्रेसला मतदान वाढणार..?
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात ज्या ज्या गावात आ. शिंदे यांच्या भेटी झाल्या ,संपर्क झाला काही ठिकाणी गो बॅक चा नारा सहन करावा लागला परंतु ज्या गावात गोव्याचा नारा झाला तिथेच काँग्रेसला मतदान जास्त होण्याची शक्यता .? असल्याचे बोलले जात आहे.
सध्या सत्ताधाऱ्यावर प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर काही भागात उमटत असून त्या नाराजीचा फायदा घेण्याची सुवर्णसंधी ही आमदार प्रणिती शिंदे यांना उपलब्ध झाली आहे त्या नाराजीचा फायदा उचलण्यास आमदार प्रणिती शिंदे यशस्वी होणार का हे पाहणेही तितकेच औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
0 Comments