LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

"गोपाळपूर - कोंढारकी" रस्ता नुसताच खडीने झाकला, बिगर डांबराचा रस्ता देतोय अपघाताला निमंत्रण..!

२९/०३/२४


लोकपर्व न्यूज नेटवर्क:-  पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर ते कोंढारकी च्या दिशेने करण्यात आलेला पाचशे मीटरचा रस्ता सध्या अपघाताला निमंत्रण देत आहे हा रस्ता करून दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी झाला आहे परंतु हा रस्ता करत तयार करत असताना संबंधित ठेकेदाराने डांबराचा अत्यल्प वापर केला असल्याचे निदर्शनास येत आहे किंवा डांबरच वापरले गेले नाही  


त्यामुळे हा रस्ता   पूर्वीच्या खड्डामय बनण्याच्या स्थितीत येणार असून अपघात ही वाढणार असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 
         गोपाळपूर पासून थोड्या अंतरावर अंतेश्वर मंदिराच्या पुढे आल्यानंतर मुंढेवाडी ला एक रस्ता जातो आणि या गोपाळपूर मुंडेवाडी रस्त्यालाच कोंढारकी कडे जाणारा एक रस्त्याचा फाटा जातो ह्या रस्त्याला लोकसभा  निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच काही तास अगोदर रस्त्याच्या कामाला मंजुरीही मिळाली होती आणि सुरुवातही झाली . परंतु हे काम ज्या ठेकेदाराने हाती घेतले त्या ठेकेदाराने व्यवस्थित काम केले नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे   हा रस्ता तयार करत असताना डांबर अतिशय अल्प प्रमाणात वापरल्याने हा रस्ता टिकाऊ न होता बइनटइकआऊ बनला आहे ,  डांबरच वापरले नसल्यामुळे हा रस्ता लागलीच उघडण्याची भीती निर्माण झाली आहे आणि डांबर न वापरल्याने वरून पसरलेली बारीक खडी अपघाताला निमंत्रण देत आहेत.. गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे ह्या रस्त्याबाबत नाराजी पसरली असून त्वरित ह्या रस्त्याला मुबलक योग्य  त्या प्रमाणात प्रमाणात डांबर  वापरण्यात यावे अन्यथा संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थातून जोर धरत आहे.

फोटो ओळी :- "गोपाळपूर ते कोंढारकी" कडे जाणारा पाचशे मीटरचा रस्ता नुसताच खडी पसरून पूर्ण करण्यात आला आहे त्यामुळे तो धोकादायक बनला आहे.

Post a Comment

0 Comments