३०/०३/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:- सोलापूर लोकसभा मतदारसंघही आता चांगलाच चर्चेत येवू लागला आहे. या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसचा इच्छुक उमेदवार म्हणून व सध्या अधिकृत उमेदवार म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांनी संपर्क दौरा चालू केला होता आणि आता तरी काँग्रेस व भाजप पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून हळूहळू प्रचार पुढे सरकत आहे.
काँग्रेस पक्षाच्या तुलनेत भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार उशिरा निश्चित करून आमदार राम सातपुते यांचे नाव उशिरा घोषित केले.
भाजप तर्फे आमदार राम सातपुते यांचे नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी
सोलापूरची लेक या नात्याने ट्विटरवर पत्र लिहून अनोख्या पद्धतीने आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारीचे स्वागत करून पुढील निवडणुकीचे 40 दिवस व्यवस्थित पार पडू अशा चे पत्र दिले.
भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनीही लागली या पत्राला जय श्रीराम म्हणत खुमासदार शैलीत समाचार घेत सुरुवात करत प्रतिउत्तर दिले.
हा पत्रा पत्रीचा खेळ चांगलाच रंगला होता आता त्याच पार्श्वभूमीवर होळी आणि रंगपंचमीच्या सणानिमित्त सोलापूर लोकसभेच्या भाजप काँग्रेसच्या उमेदवारांनी ही मतदारांना रंगपंचमीच्या शुभेच्छा मेसेज द्वारे पाठवून पत्रिका सिलसिला मतदारापर्यंत ही चालूच ठेवला आहे राजकीय धुळवडीत मतदारांनी रंगपंचमीच्या शुभेच्छा पत्राचा चांगलाच आस्वाद घेतला.
मोबाईल मेसेज द्वारे फिरणारे रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा चे सोलापूर लोकसभेच्या उमेदवारांचे मेसेज
0 Comments