लोकपर्व न्यूज नेटवर्क:- माढा लोकसभा निवडणुकीतील हळू..हळू पत्ते खुले होवू लागले आहेत एक...एक..मोहरे सोयीच्या कळपात सामील होवू लागले आहेत. काल अकलूज मध्ये अनेक माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकीय घडामोडी घडल्या..
भाजपने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाउमेदवारी दिली आहे .
तर माढा लोकसभेच्या उमेदवारीवरून इच्छुक असलेलें धैर्यशील मोहीते- पाटील यांनी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
त्यानी काय करायचे ..? या बाबतीतचा निर्णय विजयसिंह मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर यांच्या वर सोपवला.
उमेदवारी घोषित न झाल्याने कार्यकर्त्यानी मात्र प्रचंड नाराजीचा सूर उमटवला. काल सकाळी दहा वाजल्या पासूनच शिवरत्न वर कार्यकर्त्यासह नेत्यांची वर्दळ वाढू लागली होती काल दिवसभरात शिवरत्न वर विधानसभेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, रघुराज निंबाळकर, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस जयंत पाटील, आ. दिपक चव्हाण (फलटण) बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख, करमाळा माजी आमदार द्वय नारायण पाटील, जयवंतराव जगताप , संजीवराजे निंबाळकर , संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, , सातारा अनिल देसाई यांच्या सह अनेकांनी स्वतंत्र चर्चा केली. तर सर्वात शेवटी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विजयदादाची भेट घेतली. व परस्थीती पक्षाकडे कळवतो असल्याचे सांगितले.
तर उलट फक्षी उमेदवार जाहीर झालेले विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी काल माळीनगर ला राजेंद्र गिरमे यांची भेट घेतली तर आज टेंभुर्णी येथील करमाळा चे आमदार संजयमामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर , माढा आ. बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आ. संजयमामा, माळशिरसचे आ. राम सातपुते, माण चे आ. जयकुमार गोरे, सांगोला आ. शहाजीबापू पाटील यांचीही माढा लोकसभेसाठी च्या दिशेने विचार सभा घेतली. आ. शहाजीबापू यांनी विद्यमान खासदारांचा
दोन लाखांच्या मताधिक्याने विजय होईल असा आशावाद व्यक्त केला. कारण त्यानी जलसिंचन, रस्ते, विजेचे प्रश्न या बाबतीत विकास कामे केली असल्याचे सांगितले. तर आ. राम सातपुते यांनी माळशिरस मधून ही भाजपाच्या उमेदवाराला कार्यकर्ता या नात्याने निश्चित मोठ्या प्रमाणात सहकार्य होणार असल्याचे सांगितले.
या विचार विनिमय बैठकीत भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार - सावंत, करमाळ्याच्या रश्मी बागल, पंढरपूरचे कल्याणराव काळे, माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांच्या सह माढा , माण, फलटण तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
आता नेमकं काय माढ्यात होणार आहे कांहीं काळ थांबून पहावे लागणार आहे.
सध्या मात्र माढा लोकसभा गाजू लागली...काल अकलूज..आज टेंभुर्णी ; दिशा लढतीची स्पष्ट होवू लागली.!
0 Comments